Devendra Fadnavis sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Flood : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 11 हजार कोटी रुपये मंजूर

Relief Package for Farmers : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अद्याप अनेक शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळालेली नाही. यावरून शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

Sudesh Mitkar

  1. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.

  2. काही शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

  3. पुढील 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ही मदत जमा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Pune News : राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत 8 हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना पोचली असून, याचा लाभ 40 लाख शेतकर्‍यांना झाला आहे.

पुढील पंधरा दिवसांमध्ये आणखी 11 हजार कोटी रुपये देण्यात येणार असून आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. ही मदत पुढच्या 15 दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

फडणवीस म्हणाले, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जात असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी 11 हजार कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधीची कुठलीही कमतरता नाही.

पुढील 15 दिवसांत ही मदत अतिवृष्टग्रस्त जिल्ह्यातील किमान 90 टक्के शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी जशा याद्या मिळाल्या, तसा निधी वितरित करण्यात आला. ज्यांना केवळ दोन हेक्टरसाठी मदत मिळाली आहे, त्यांना पुढील हेक्टरसाठीचे अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, काही शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत, तर काहींच्या नोंदींमध्ये त्रुटी आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आले आहे. या सर्व बाबी तपासून उर्वरित 10 टक्के शेतकर्‍यांपर्यंतही तातडीने मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कुणीही पात्र शेतकरी मदतपासून वंचित राहू नये व अपात्र खातेधारकांच्या खात्यावर निधी जावू नये, यासाठी ई-केवायसी केली जात आहे.

अ‍ॅग्रीस्टॅकचा डेटा राज्य शासनाकडे असून यामध्ये ज्या शेतकर्‍यांची माहिती उपलब्ध आहे. त्यांची पुन्हा ई-केवायसी केली जात नाही. तर सहायता निधी थेट त्यांच्या खात्यात जमा केला जात असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

FAQs :

1. राज्य सरकारने किती मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे?
राज्य सरकारने 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.

2. ही मदत कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे?
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.

3. मदत कधीपर्यंत मिळणार आहे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, पुढील 15 दिवसांत ही मदत खात्यात जमा केली जाईल.

4. ही रक्कम कशा प्रकारे मिळणार आहे?
शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल.

5. या पॅकेजचा उद्देश काय आहे?
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देऊन त्यांना स्थिरता मिळवून देणे हा या पॅकेजचा उद्देश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT