Vishwajeet Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishwajeet Kadam : कोरड्या कृष्णेत आंदोलन करणाऱ्या आमदार विश्वजीत कदमांना थेट मुख्यमंत्र्यांचा फोन; गाठ माझ्याशी म्हणत शंभूराज देसाईंना कडक इशारा

Krishna River Water Issue : सांगलीला कोयना धरणातून पाणी सोडण्यावरून विश्वजित कदम आणि शंभूराज देसाई यांच्यात वाद निर्माण झाला. आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कदमांना फोन केल्याने त्यांच्या निर्णयाकडे सांगलीकरांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sangli, 26 October : दुष्काळामुळे राज्यातील पाणी पेटण्याची चिन्हे आहेत. कोयना धरणातून सांगलीसाठी पाणी सोडण्यावरून राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि काँग्रेस आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यात जोरदार वाद रंगला आहे. सांगलीला पाणी देताना महाराष्ट्रातील कोणताही मंत्री आडवा आल्यास गाठ माझ्याशी आहे, असा इशारा देसाई यांना नाव न घेता लगावला.

दरम्यान, आंदोलनादरम्यान डॉ. विश्वजित कदम यांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. आमदार कदम यांनी सांगलीच्या पाण्याची कैफियत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडली. आता मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे सांगलीकरांचे लक्ष लागले आहे.

सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे, त्यामुळे कृष्णा काठावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाला आहे. कोयना धरणातून कृष्णा नदी पात्रामध्ये पाणी सोडावे, या मागणीसाठी आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी भिलवडी येथे कोरड्या कृष्णा नदीच्या पात्रात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सांगलीला पाणी देण्याबाबत महाराष्ट्रातला कोणताही मंत्री आडवा आल्यास तर गाठ माझ्याशी आहे...असा इशारा देत पाण्याचे राजकारण करू नका, अशा शब्दांत आमदार विश्वजीत कदम यांनी कोयना धरणातून अडवण्यात येणाऱ्या पाण्यावरून साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना अप्रत्यक्षरीत्या इशारा दिला आहे.

दरम्यान, कृष्णा नदीच्या पाणी प्रश्नावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी थेट आमदार विश्वजीत कदम यांना फोन लावला. आमदार कदम यांनी पाण्याची कैफियत मांडली. त्यावर मुख्यमंत्री पाणी सोडण्याबाबत कोणता निर्णय घेतात, याकडे सांगलीकरांचे लक्ष लागले आहे.

कृष्णा नदी सांगली जिल्ह्यातील भिलवडी या ठिकाणी कोरडी पडली आहे. याच मुद्यावरून आमदार विश्वजीत कदम यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सोबत कृष्णा नदीच्या पात्रात आंदोलन केले. आंदोलानंतर ग्रामस्थांना मार्गदर्शन करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा आमदार कदम यांना फोन आला. यावेळी आमदार विश्वजीत कदम यांनी कृष्णा नदीच्या पाण्याची कैफियत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर फोनद्वारे मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT