Sadabhau Khot
Sadabhau Khot Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देश वाऱ्या करतात!

Sampat Devgire

सोलापूर : राज्यातील सरकारचे (Mahavikas Aghadi) मंत्री तसेच त्यांच्या नेत्यांनी जनतेच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री (Uddhav Thakre) घरात बसतात आणि त्यांचे युवराज (Aditya Thakre) देशाच्या वाऱ्या करत असतात, अशी टिका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे. (Ex minister Sadabhau Khot criticised Aditya Thakre Ayodhya Tour)

श्री. खोत काल सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व नेत्यांवर टीका केली.

आदीत्य ठाकरे यांचे नाव न घेता ते म्हणाले, आज ते अयोध्येच्या स्वारीवर गेले आहेत. ज्यांनी अयोध्येच्या मंदिराच्या वर्गणीमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आणि गोंधळ घातला. ते हा दौरा करीत आहेत, हे विशेष. राम मंदिर बांधायची यांच्यात हिम्मत नाही, तेच आता आयोध्येला निघालेत.

ते पुढे म्हणाले, त्यांचे राजकारण पाहिले तर, यांना रामाचाही जप करायचा आहे आणि कॉंग्रेस वगैरे आहेत त्यांना हिरवे झेंडे खांद्यावर घेऊन नाचायचे देखील आहे. मात्र एका म्यानात दोन तलवारी राहतील कश्या? आता त्या राहू शकत नाहीत. मग तुम्ही रामाला जावा नाही तर काशीला जाऊन आंघोळ करा. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून तुम्ही संपलेले आहात.

महाराष्ट्राचा अपमान कसा?

श्री खोत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान यांच्या पुणे कार्यक्रमात बोलू दिले नाही, म्हणून महाराष्ट्राचा अपमान झाला यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, मला या लोकांचे हसू येते, काही घडले की महाराष्ट्राचा अपमान कसा होतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? मला वाटते महाराष्ट्राचा बिलकूल अपमान झालेला नाही.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT