Satara Collector sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : महाबळेश्वरातील अतिक्रमणांवरुन जिल्हाधिकारी आक्रमक; दोन दिवसांत हातोडा टाकणार

Jitendra Dudi सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात नवमतदार नोंदणीस मुदतवाढ दिल्याबद्दलची माहिती देण्यासाठी श्री. डुडी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Umesh Bambare-Patil

Satara News : महाबळेश्वर येथील अतिक्रमणांवर दोन दिवसांत पुन्हा कारवाई सुरू होणार आहे. त्यापूर्वी संबंधितांनी स्वत:हून अतिक्रमणे हटवावीत. कोणीही नव्याने अतिक्रमणे करू नयेत, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात नवमतदार नोंदणीस मुदतवाढ दिल्याबद्दलची माहिती देण्यासाठी श्री. डुडी Satara Collector यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले पाहिजे. यासाठी आमचा प्रयत्न आहे. गतवेळच्या गडचिरोली जिल्ह्याचे रेकॉर्ड साताऱ्याला मोडायचा आहे, असा संकल्प आम्ही केला आहे.

महाबळेश्वरच्या Mahabaleshwar Encroachments अतिक्रमणावरील कारवाईबाबत ते म्हणाले, दोन दिवस थांबा पुन्हा कारवाई सुरू होईल. तसेच कोणतेही नवीन अतिक्रमण होणार नाही, याची आम्ही दक्षता घेत आहोत. यापूर्वीची ज्यांची अतिक्रमणे आहेत. त्यांनी ती स्वत:हून हटवावीत. त्यांना आम्ही एक संधी दिली आहे.

दुष्काळाच्या अनुषंगाने विचारले असता श्री. डुडी म्हणाले, पाण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे. सध्या कोणतीही टंचाई नसून ज्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. ते पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. चारा डेपोचे दोन प्रस्ताव पाठवले असून, जेथे गरज आहे तेथीलच प्रस्ताव दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सातारा शहरातील वाहतुकीच्या समस्येबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासोबत संयुक्त पाहणी केली जाईल. तसेच एसटीच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही २९ डिसेंबरला बैठक घेणार आहोत. त्यातून वाहतूक कोंडीची समस्या सोडवली जाईल, असे श्री. डुडी यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT