Satara Collector News : इर्शाळवाडीत येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सक्रिय झाले असून त्यांनी आज पाटण तालुक्यातील दरड प्रवण भागाची पहाणी केली. तसेच येथील नागरीकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन केले. तसेच मिरगाव येथील नागरिकांची भेट घेऊन त्यांना निवारा केंद्रांमध्ये जाण्यास सांगितले.
दरड प्रवण गावातील नागरिकांनी तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी Satara Collector यांनी केले. जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील Patan Taluka दरडग्रस्त गावांची पाहणी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी सुनील गडे, तहसीलदार रमेश पाटील, गट विकास अधिकारी मिना साळुंखे यांच्यासह संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थलांतरितांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रांमध्ये पाणी, वीज यासह नागरी सुविधा उभारण्यात आल्या असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, ज्या ज्या वेळी जिल्ह्याला रेड आणि ऑरेंज अलर्ट असेल त्यात्या वेळी दरड प्रवन व धोकादायक गावांमधील नागरिकांना तातडीने निवारा केंद्रांमध्ये हलविण्याची कार्यवाही स्थानिक प्रशासनाने करावी. यास गावांमधील नागरिकांनी सहकार्य करावे.
जिल्ह्यात सध्या अतिवृष्टीचा इशारा आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी व प्रशासनाने खबरदारी घ्यावी, निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत तसेच काही शाळा व काही मंगल कार्यालये ही निवारा केंद्र म्हणून तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. त्यामुळे रेड आणि ऑरेंज अलर्ट मिळाल्यानंतर नागरिकांनी तातडीने या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित व्हावे.
या वेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी मिरगाव येथील नागरिकांची भेट घेऊन त्यांना निवारा केंद्रांमध्ये जाण्याविषयी सांगितले. तसेच अतिवृष्टीमुळे साकव वाहून गेलेल्या चाफेर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ओझर्डे येथील दरड कोसळलेल्या ठिकाणची ही त्यांनी पाहणी केली व याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.