Sharad Pawar, Udhav Thackeray, K. Chandrashekhar Rao sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur BRS News: 'महाविकास'ची चिंता वाढली; बीआरएसकडुन शेतकरी मतदार टार्गेट

K. Chandrashekhar Rao News: के. चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समिती पक्षाचा विस्तार करण्यासाठी तेलंगणाच्या सीमेलगत असणाऱ्या महाराष्ट्राची निवड केली.

Umesh Bambare-Patil

-संभाजी थोरात

Kolhapur News : भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगली, कोल्हापूरचा दौरा करून शेतकरी मतदार टार्गेट केलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ताकत असलेल्या महाविकास आघाडीला भारत राष्ट्र समितीच्या एन्ट्रीचा फटका बसणार आहे.

के. चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समिती पक्षाचा (Bharat Rashtra Samiti) विस्तार करण्यासाठी तेलंगणाच्या सीमेलगत असणाऱ्या महाराष्ट्राची (Maharashtra) निवड केली. मोठ्या प्रमाणात जाहिरात करून त्यांनी तेलंगणामध्ये शेतकऱ्यांसाठी केलेलं काम महाराष्ट्राभर पोहचवले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात पोहचण्याचा प्रयत्न भारत राष्ट्र समिती करत आहे. अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सुरू आहेत.

राज्यातील मोठा नेता मिळाला नसला तरी काही माजी आमदार बीआरएसच्या गळाला लागले आहेत. राज्यातील शेतकरी संघटनांमधील कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात बीआरएसकडे ओढले जात आहेत. बीआरएसकडून पदाधिकाऱ्यांना पक्ष कार्यासाठी आर्थिक रसदही पुरवली जात असल्याची चर्चा आहे.

आता या पक्षाचे १४ लाख सदस्य झाले आहेत. त्यांचे मुख्य लक्ष्य ग्रामीण भाग आहे. अब की बार किसान सरकार अशी टॅग लाईन घेऊनच ते महाराष्ट्रात उतरले आहेत. त्यामुळे शेतकरी मतांचा गठ्ठा ते आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित आहे. भाजप आणि युती शहरी भागात मजबूत आहे.

मात्र ग्रामीण भागात कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला माणणार्ऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मतांचे विभाजन होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची चिंता आणखीच वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT