पश्चिम महाराष्ट्र

देगलूर पोटनिवडणूकीसाठी कॉंग्रेसकडून जितेश अंतापूरकरांना उमेदवारी जाहीर

सरकारनामा ब्युरो

पंढरपूर : पंढरपूरात (Pandharpur) देगलूर (Deglur) मतदार संघाची येत्या ३० ऑक्टोबरला पोटनिवडणूक (By-polls election) जाहीर करण्यात आली. कोरोनामुळे कॉंग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांचे निधन झाल्याने त्यांच्य जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसने नुकतीच जितेश अंतापूरकरांची (Jitesh Aantapurkar) उमेदवारी जाहीर केली आहे.

तर दूसरीकडे, मात्र अशातच भाजपने शिवसेनेचा मोठा आमदार गळाला लावला आहे. देगलूरचे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपने उनेदवारी दिली आहे. दोन दिवसांपुर्वीच त्यांनी भाजपात प्रवेश केला.

दरम्यान गेल्या वेळी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढली होती. मात्र तरीही भाजापच्या उमेदवाराचा याठिकाणी विजय झाला होता. खरंतर, विद्यमान आमदार, खासदाराचे निधन झाले तर त्याच्या पत्नीला, मुलाला किंवा मुलीला उमेदवारी दिली जाते. परंतू पंढरपूरमध्ये भाजपने उमेदवारी देऊन बहुमताने विजय मिळवला.

सुभाष साबणे यांची बंडखोरी

साबणे यांना पक्षात घेण्यासाठी भाजपची बैठक झाली होती. त्या बैठकीला खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तर सुभाष साबणे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नरसी नायगावला गेले होते. देवेंद्र फडणवीस आणि सुभाष साबणे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. साबणे हे शिवसेनेचे मराठवाडा प्रतोद, विधानसभेचे तालिका सभापती राहिलेले आहेत. तर ते तीन वेळा आमदार राहिलेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT