Madha Nagar Panchayat Election Result 
पश्चिम महाराष्ट्र

माढा नगरपंचायत निकाल: कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत, शिवसेना, राष्ट्रवादीला दोन जागा

माढा नगरपंचायतीचा निवडणूकीच्या निकालानुसार १५ जागांपैकी काँग्रेसने १० जागांवर विजय मिळवला आहे.

सरकरानामा ब्युरो

सोलापूर : माढा नगरपंचायतीचा (Madha Nagar Panchayat Election Result) निवडणूकीचे निकाल हाती आले आहेत. बार्शीचे विद्यमान आमदार राजाभाऊ राऊतांना जबरदस्त धक्का बसला असून वैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर माढ्यात कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या १५ जागांपैकी काँग्रेसने १० जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादीला दोन, शिवसेनेला दोन जागा. एका जागेवर अपक्ष उमेवादाने बाजी मागल्याचे दिसत आहे.

माढा नगरपंचायतीच्या निवडणूकीच्या निकालानुसार प्रभाग सहामध्ये राष्ट्रवादीच्या संजीवनी भांगे 204 आघाडीवर आहेत. तर प्रभाग क्रमांक 7मध्ये शिवसेनेच्या अर्चना कानडे 222 यांना मते मिळाली आहेत. प्रभाग आठ मध्ये अपक्ष उमेदवार संगीता साठे यांनी 307 मिळवली आहेत. तर प्रभाग क्रमांकमध्ये 9 मध्ये राष्ट्रवादीचे चंद्रशेखर गोटे यांना 242 मतांनी आघाडीवर आहेत. तसेच प्रभाग दहामध्ये कॉंग्रेसच्या शबाना बागवान यांना 258 मते मिळाली आहेत. (Madha Nagar Panchayat Election Result)

तर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी ( Bodwad Nagar Panchayat election) झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे. एकुण १७ जागासाठी मतदान झाले आहे. यापैकी तीन जागांचे निकाल लागले असून यात राष्ट्रवादीचा दोन, तर शिवसेनेनं एका जागेवर विजय मिळविला आहे.

बोदवड हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघातील नगरपंचायत आहे. या नगरपंचायतीवर खडसे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर प्रथमच या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या निवडणूकीत सर्वच्या सर्व १७ जागा लढविल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT