Sangram Thopate .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangram Thopate News: पश्चिम महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप? तीनवेळा आमदार राहिलेला नेता काँग्रेसची साथ सोडणार, भाजप प्रवेशाची तारीखही ठरली ?

Sangram Thopate News : पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत मोठा धक्का दिली होता. आता पुन्हा एकदा भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघांमधून काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

Sudesh Mitkar

Pune News : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेमधील अनेक नेते, पदाधिकारी महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये पक्ष प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. त्यातच आता पश्चिम महाराष्ट्र मधून एक मातब्बर नेता काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातून काँग्रेसचे माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात होता. यानंतर आता भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघांमधून सलग तीन वेळा आमदार झालेले काँग्रेसचे मातब्बर नेते संग्राम थोपटे हे काँग्रेसची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या संग्राम थोपटे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. नवख्या शंकर मांडेकर यांना ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक रिंगणात उतरवलं आणि थोपटेंना तब्बल वीस हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील संग्राम थोपटे हे भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं. काँग्रेसची सत्ता असताना संग्राम थोपटे हे विधानसभा अध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना सातत्याने डावलण्यात येत होतं. याबाबत त्यांनी वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी देखील केल्या होत्या. मात्र तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने ते नाराज असल्याचे सांगितलं जात होतं. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच ते काँग्रेसला सोडचिट्टी पंचवीस देतील असं बोललं जात होतं. तरीदेखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावरच निवडणूक लढण्याचा पाहायला मिळालं.

मात्र गेल्या काही दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये तितके सक्रिय नसल्याचे पाहायला मिळत होतं. अशातच आज त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीचं उद्देश जरी समोर आलेला नसला तरी आगामी काळातील राजकीय भवत्याबाबत ते प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

येत्या दोन दिवसात येत्या रविवारी संग्राम थोपटे हे काँग्रेसचा राजीनामा देणार असल्याचे सांगितलं जात असून 22 एप्रिल रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करतील असं देखील बोलले जात आहे. काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

संग्राम थोपटे हे गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसचे आमदार म्हणून विधानसभेमध्ये होते. त्यापूर्वी तब्बल 25 वर्ष त्यांचे वडील माजी शिक्षण मंत्री अनंतराव थोपटे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलं. त्यामुळे मागील 40 दशकांपासून थोपटे कुटुंबाने हा मतदारसंघ काँग्रेसचा गड बनवला होता. थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलास काँग्रेसचा हा गड भाजपचा होणार आहे. याबाबत संग्राम थोपटे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT