Satej Patil on Chhatrapati Sambhajiraje, Chhatrapati Sambhajiraje Latest News in Marathi, Satej Patil News, Chhatrapati Sambhajiraje News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

संभाजीराजे काँग्रेसमध्ये येणार? सतेज पाटलांचे सूचक संकेत

खासदार संभाजीराजे छत्रपती यांची तीन मे रोजी राज्यसभेच्या खासदारकीची मुदत संपत आहे.

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांची तीन मे रोजी राज्यसभेच्या खासदारकीची मुदत संपत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी नवी राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यावरून राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच गृह राज्यमंत्री व काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी सूचक वक्तव्य केल्याने चर्चेला उधाण आलं आहे. (Chhatrapati Sambhajiraje Latest News in Marathi)

कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलताना पाटील यांनी संभाजीराजे काँग्रेसमध्ये (Congress) आले तर त्यांचे स्वागत केले जाईल, असं म्हटलं आहे. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली आहे. मालोजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमधून आमदार म्हणून चांगले काम केले आहे. संभाजीराजे आपली पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार असून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ते काँग्रेसमध्ये आले तर स्वागतच आहे, असं पाटील म्हणाले.

खासदार संभाजीराजे हे छत्रपती घराण्यातील आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश करावा, असे प्रत्येकच राजकीय पक्षाला वाटते. पण त्यांच्याशी राजकीय चर्चा झाली नसल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. मराठा आंदोलन, आरक्षण, सारथी अशा विविध प्रश्नांवर चर्चा झाली. ते छत्रपतींच्या घराण्यातील असल्याने ते आपल्या पक्षात यावेत, असे वाटण्यात गैर काहीच नाही, असे पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत मालोजीराजे हे सक्रीयपणे प्रचारात सहभागी झाले होते. याविषयी बोलताना पाटील म्हणाले, पोटनिवडणुकीत विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मी त्यांची भेट घेऊन प्रचारात सक्रिय होण्यास विचारले होते. मालोजीराजे यांनीही प्रचारात सहभाग घेतल्याने काँग्रेसला फायदा झाला. असं सांगत पाटील यांनी संभाजीराजे काँग्रेसमध्ये आले तर स्वागत केले जाईल, असं स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT