gokul election politics; Devendra Fadnavis, satej patil and mahadev mahadik sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil : 'महाडिक साहेबांची सत्ता होती, तेंव्हा हस्तक्षेप होतं नव्हता', सतेज पाटलांनी अखेर 'तो' क्षण सांगितला

Satej Patil On Devendra Fadnavis Influence Over Gokul : सध्या गोकुळचे राजकारण चांगलेच तापले असून महायुतीतील मतभेदांना उकळी फुटली आहे. यावरून आता आमदार सतेज पाटील यांनी मोठे भाष्य केलं आहे.

Rahul Gadkar

kolhapur gokul politics : गोकुळ दूध संघाचे अध्यक्षपदाची निवडणूक आणि सध्याचे गोकुळच्या राजकारणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवलेली पकड यावर आमदार सतेज पाटील यांनी मोठे भाष्य केलं आहे. जिल्ह्यातील नेत्यांमध्ये कुमकवतपणा असल्यानेच ते करू शकत नाहीत. पण गोकुळमध्ये गेली 25 ते 30 वर्ष महाडिक साहेबांचं पॅनेल होतं. त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं. तेंव्हा विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी आम्ही कुठेही हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नेते कुमकवत असतील तर राज्यातील नेत्यांना हस्तक्षेप करायला संधी मिळते, अशी महायुतीतील राजकारणावर आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महायुतीचे सर्व नेते एकत्र असले तरी दूध उत्पादक शेतकरी माझ्या बाजूने आहे. तीन महिने तुम्ही गोकुळची बदनामी का केली? तुम्ही गळ्यात गळे घालायचे होते तर गोकुळचा ब्रँडची बदनामी का केली? प्रत्यक्ष निवडणूक लागेल त्याच वेळी सगळं समोर येईल. ज्यावेळी महाविकास आघाडीचा अध्यक्ष होता. त्यावेळी आम्ही काय केलं का? महायुतीचा चेअरमन ज्यावेळी झाला तेव्हापासून हे सगळं सुरू झालं. त्यांच्यामधील भांडणाचा फटका गोकुळला बसू नये, असेही आमदार पाटील म्हणाले.

प्रशासक नेमण्यावरून मंत्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांना 22 वेळा सांगितलं होतं. प्रशासक नेमू नका अशी त्यांची मागणी होती. मात्र तरी देखील मुख्यमंत्र्यांनी का ऐकलं नाही? उलट मंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रस्ताव वेगळाच होता. प्रशासक मंडळावर अध्यक्ष कोण करायचं याचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी ठेवला होता. मात्र ते देखील ऐकलं नाही आणि अधिकारी म्हणून प्रशासक नेमला.

विधान परिषदेच्या निवडणुकीवरून बोलताना, विचारांची लढाई भाजपच्या विरोधात ही लढाई सुरु आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष या निवडणुकीत एकत्र लढतील. सोलापुरात बाबासाहेब देशमुख यांनी वेगळी भूमिका घेतली असेल तर नंतर यांना राष्ट्रवादीचा व्हीप लागेल. त्यावेळी त्याला आमच्यासोबत राहावे लागेल, असे आमदार पाटील म्हणाले.

गोकुळचे ठराव गोळा करणे हा पहिला टप्पा आहे. योग्य माणसाला ठराव देण्याचे ठरवावे संस्था चालकांना असे आवाहन आम्ही केले आहे. पण महायुतीत भाविकितील भांडण रोज सुरु आहे. त्यांचं काय सुरु आहे माहिती नाही. एक भावकी म्हणते बांधवारचे भांडण मिटलेले आहे. दुसरे म्हणते अजून मिटायचं आहे, अजून वाटण्या व्हायचे आहे. पण किती संस्था रद्द होणार यावर सर्व काही ठरेल. असे आमदार सतीश पाटील यांनी स्पष्ट केले.

पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराचा बालेकिल्ला राहिला आहे. पक्षाचे लेबल घेऊन कधीही आम्ही सहकाराची निवडणूक लढवली नाही. गोकुळ हा साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. पक्षाला महत्त्व देण्यापेक्षा गोकुळच्या शेतकऱ्यांच्या हिताच रक्षण व्हावं असा आम्हाला वाटतं, असे आमदार सतेज पाटील म्हणाले.

जिल्हा समिती बैठकीवरून बोलताना, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जाऊन काय करायचं? तिथे निधीच देत नाहीत तर मग बैठकीला का जायचं? समान वाटप करत निधी दिला तर बैठकीला जाण्यात अर्थ आहे. बोलून ऐकणार सरकार असतं तर त्या बैठकीला जाणे अर्थ आहे, अशी खंत आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT