Kolhapur News : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत फेरमतमोजणीनंतर मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला फेरमतमोजणीत धक्का बसला असून सतेज पाटलांची 1 जागा कमी झाली आहे. तर दुसरीकडे, आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाला लॉटरी लागली असून त्यांच्या वाट्याला आलेल्या दोन्ही जागांवर त्यांचे उमेदवारांनी विजय झाले आहेत.
सुरुवातीच्या मतमोजणीच्या कलांमध्ये सतेज पाटील यांच्या आघाडीचे १४ उमेदवार आघाडीवर होते, तर महायुतीचे ११ उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र होते. मात्र, काही जागांवरील मतांचे अंतर अत्यंत कमी असल्याने फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली. त्यानंतर झालेल्या फेरमतमोजणी नंतर बदललेल्या आकडेवारीमुळे समविचारी आघाडीच्या उमेदवारांची संख्या १४ वरून १३ वर आली आहे. तर आघाडीच्या उमेदवारांची संख्या ११ वरून १२ झाली आहे. तरिही सतेज पाटील यांचीच गोकुळवर एक हाती सत्ता येण्याची शक्यता असून बहुमताचा १३ चा आकडा समविचारी आघाडीकडे आहे.
फेरमतमोजणीत सचिन घोरपडे यांना धक्का
सर्वसाधारण गटातील सतेज पाटील गटाचे उमेदवार सचिन दौलतराव घोरपडे हे सुरुवातीच्या मतमोजणीत आघाडीवर असल्याचे सांगितले जात होते. मात्र, फेरमतमोजणीनंतर त्यांच्या मतांमध्ये पिछाडी झाल्याचे वृत्त आले. घोरपडे आणि महायुतीचे अमर पाटील यांच्यात अवघ्या काहीच मतांचे अंतर होते. फेरमतमोजणीत सचिन घोरपडे यांना धक्का बसला असून अमर पाटील यांना विजयी झाले आहेत. असेच महायुतीचे कर्णसिंह गायकवाड यांच्या बाबतीत देखील झाले असून पॅनेल टू पॅनेल मतदान फेरमतमोजणीत वाढल्याने कर्णसिंह गायकवाड विजयी झाले आहेत. या बदलामुळे महायुतीच्या जागांमध्ये वाढ झाली असून ती आता १२ वर गेली आहे.
सतेज पाटलांचा गंभीर आरोप
दरम्यान फेरमतमोजणीत सचिन घोरपडे यांना धक्का लागल्यानंतर सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी, मतमोजणीला मुद्दामहून उशीर केला जातोय, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाला दिलासा
दरम्यान गोकुळ निवडणुकीत महायुतीत सहभागी असणाऱ्या जनसुराज्य शक्ती पक्षाला दोन जागा देण्यात आल्या होत्या. पक्षाने अमरसिंह पाटील आणि कर्णसिंह गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. तर सर्वसाधारण गटात या दोघांची पिछेहाट झाली होती. ज्यामुळे आमदार विनय कोरे यांच्यासह त्यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात होते.
मात्र, फेरमतमोजणीनंतर या दोन्ही उमेदवारांनी निर्णायक विजय मिळवला असून महायुतीतील विनय कोरे गटाला दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, सतेज पाटील यांच्या आघाडीच्या जागांमध्ये घट झाल्याने गोकुळच्या सत्तासमीकरणात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.