Pravin Darekar
Pravin Darekar 
पश्चिम महाराष्ट्र

कॉंग्रेस- राष्ट्रवादीसोबच्या आघाडीने शिवसेनेचा केंद्रबिंदू बदलला

सरकारनामा ब्युरो

विश्वभुषण लिमये

सोलापूर : काँग्रेस - राष्ट्रवादीबरोबर (Congress- NCP) सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेनेचा केंद्रबिंदू बदलला आहे. अगोदर शिवसेनेचा (Shivsena) केंद्रबिंदू हा बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व होता. मात्र, आता शिवसेनेचे केंद्रबिंदू हे गांधी घराणं झालेलं आहे, त्यामुळे शिवसेना आता गांधी घराण्याभोवती पिंगा घालताना दिसून येत आहे,'' अशा शब्दांत विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी शिवसेनेला (Shivsena) पुन्हा डिवचले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना युपीएत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 'शिवसेना या अगोदरच काँग्रेसबरोबर गेली. आता ती युपीएत गेली तर काही मोठा फरक पडणार नाही. सत्तेसाठी काँग्रेस - राष्ट्रवादीला भागीदार बनवणाऱ्या शिवसेनेने हिंदुत्व आणि मराठी माणसाला तिलांजली दिली, असंही प्रवीण दरेकरांनी म्हटंल आहे.

तसेच, महाविकास आघाडी सरकार हे दीर्घकाळ टिकू शकणार नाही. सरकारमध्ये असणारा विसंवाद हा प्रशासनामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे राज्याचा एक इंच ही पुढे जात नाही. आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. तीन पक्षांचे हे सरकार आपापल्यातील विसंवाद आणि अंतरविरोधातून 100% कोसळणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रेम हे बेगडी आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी साहित्यसंमेलनाला दुरून नमस्कार केला. असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, यावेळी त्यांनी अखिल भारतीय साहित्य संम्मेलनात ज्येष्ठ संपादक गिरीष कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या प्रकारावरही भाष्य केलं. विचारवंत, पत्रकार, लेखकांच्या लेखणीने समाजाला दिशा मिळत असते. त्यामुळे त्यांनी लोकभावनेचा आदर केला पाहिजे.

जर अशा लोकांनी बेमालुमपणे समाजाच्या भावना बिघडवल्या, श्रद्धास्थानांवर लिहिलंत तर ऍक्शनला रिऍक्शन मिळणारच. त्यामुळे गिरीश कुबेरांवरील शाई हल्ला ही ऍक्शनला रिऍक्शन होती, अशा स्वरूपात ती करायला नको होती, मात्र ती ऍक्शनला आलेली रिऍक्शन होतीअसं म्हणतं प्रवीण दरेकरांनी संभाजी ब्रिगेडने केलेल्या कृतीचं समर्थन केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT