Congress andolan satara
Congress andolan satara pramod ingale, satara
पश्चिम महाराष्ट्र

महागाई विरोधात साताऱ्यात काँग्रेसचे आंदोलन, मोदी सरकारचा नोंदविला निषेध

Umesh Bambare-Patil

सातारा : वाढत्या महागाईच्या निषेधार्थ आज साताऱ्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध व्यक्त केला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी नरेश देसाई, रजनीताई पवार, धनश्री महाडिक, दत्तात्रेय धनावडे, मनोज तपासे, विश्वंभर बाबर, अन्वर पाशा खान, सर्जेराव पाटील, रजिया शेख, सौ. घोरपडे, श्रीकांत चव्हाण, नजीम इनामदार, निवास थोरात, अभिजित पाटील, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीवेळी पराभवाच्या चिंतेने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती केंद्र सरकारने रोखून धरल्या होत्या. परंतू निवडणूका होताच पुन्हा दरवाढ करून जनतेस लुटण्यास सुरवात केली आहे, असे सांगून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले, मागील दहा दिवसात इंधनाच्या दरात आठ रूपयांहून अधिकची वाढ झाली असल्याने याचा आम्ही जिल्हा काँग्रेसच्यावतीने निषेध करत आहोत.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपचे सरकार सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेची लूट करत आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत इंधनदरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT