Satara News: जिंदाबाद जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद, मोदी हटाव देश बचाव, राहुल गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नही चलेगी... अशी घोषणाबाजी करत खासदार राहूल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आज काँग्रेस भवनासमोर निदर्शने केली.
भारतीय जनता पक्षाच्या या षडयंत्राविरोधात काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन झाले. यावेळी जिंदाबाद जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद, मोदी हटाव देश बचाव, राहुल गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नही चलेगी... अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
भाजपने राहुल गांधींविरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले आहे. अशाच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत कोर्टाने गुरुवारी खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. याचा जिल्हा काँग्रेस निषेध करत असल्याचे नरेश देसाई यांनी सांगितले.
यावेळी धनश्री महाडिक, छायादेवी घोरपडे, अन्वरपाशा खान, दत्तात्रय धनवडे, रफिक बागवान, जगन्नाथ कुंभार, संदीप माने, श्रीकांत चव्हाण, विजय मोरे तानाजी शिंदे, आनंदराव जाधव, संभाजी उतेकर,सुरेश कुंभार, जयंतीलाल तपासे, दिलावर पैलवान आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.