Kolhapur Political News : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अभूतपूर्व राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसप्रणित राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने मतमोजणीत जोरदार मुसंडी मारली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये समविचारी आघाडीचे १४ उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले, तर महायुतीच्या उमेदवारांनाही काही जागांवर आघाडी मिळाली.
गोकुळच्या २५ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बहुमतासाठी १३ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्या आघाडीने मिळवलेली आघाडी महत्त्वाची मानली जात आहे. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत महायुतीला कडवे आव्हान देत समविचारी आघाडीने सत्तेच्या दिशेने दमदार वाटचाल केल्याचे चित्र दिसत आहे.
सतेज पाटील विरुद्ध महायुती, प्रतिष्ठेची लढाई
यंदाची गोकुळ निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरली. सतेज पाटील यांनी दूध उत्पादक शेतकरी आणि ठरावधारकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत निवडणुकीच्या मैदानात ताकद लावली होती. दुसरीकडे, गोकुळची सत्ता कायम राखण्यासाठी महायुतीनेही सर्व ताकद पणाला लावली होती.
जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदारांच्या पाठबळासह महायुतीने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राज्य पातळीवरील नेतृत्वाचेही महायुतीला समर्थन मिळाले होते. मात्र, या राजकीय ताकदीसमोर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने जोरदार लढत दिल्याचे मतमोजणीच्या कलांमधून दिसून आले.
गोकुळ निवडणूक निकाल : मतांच्या आकडेवारीसह उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे
1. अभिजित प्रभाकर तायशेटे — २,०८०
2. शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर — २,०४५
3. राहुल पांडुरंग पाटील — १,९७३
4. चेतन अरुण नरके — १,९६६
5. अजित शशिकांत नरके — १,९२४
6. किसन बापूसो चौगले — १,९०३
7. अंबरीषसिंह संजय घाटगे — १,८७७
8. बाबासाहेब श्रीपती चौगले — १,८२८
9. राहुल बजरंग देसाई — १,८१८
10. विद्याधर बाबूराव गुरबे — १,८०९
11. विरेंद्र संजय मंडलिक — १,७९८
12. मदन बाबुराव देसाई — १,७९७
13. बाबासाहेब विष्णू देवकर — १,७९४
14. राजेश नरसिंगराव पाटील — १,७७७
15. रणजितसिंह दिलीपराव पाटील — १,७७६
16. रणजितसिंह कृष्णराव पाटील — १,७४६
17. अजित पांडुरंग पाटील — १,७१८
18. सचिन दौलतराव घोरपडे — १,७०२
19. विश्वजीत दिनकरराव जाधव — १,६८७
20. युवराज दत्ताजीराव पाटील — १,६८७
राखीव गटातील उमेदवार
- महिला राखीव गट: अंजना केदारी रेडेकर, भाग्यश्री धीरज डोंगळे
- इतर मागासवर्गीय गट: शशिकांत शामराव खोत
- अनुसूचित जाती गट: राजू बाबा आवळे
- भटक्या-विमुक्त जमाती गट: बयाजी शेळके
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने मिळवलेली आघाडी कोल्हापूरच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, अंतिम निकाल आणि पॅनेलनिहाय जागांचे अधिकृत चित्र स्पष्ट झाल्यानंतरच सत्तास्थापनेबाबत निश्चित निष्कर्ष काढता येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.