Balasaheb Thorat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

देगलूरमध्ये काॅंग्रेसचा मोठा विजय होईल

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चांगली प्रचार यंत्रणा राबवलेली आहे.

भारत नागणे

पंढरपूर : नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकित काँग्रेस पक्षाचा मोठा विजय होईल, असा दावा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. (Congress will win big in Deglaur by-election : Balasaheb Thorat)

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आज (ता. ३० ऑक्टोबर) सांगोला येथे आले होते. त्यावेळी बोलताना थोरात यांनी वरील दावा केला आहे. देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. हा मतदारसंघ काँग्रेसच्या विचारांना मानणारा आहे. यापूर्वी आमच्याच पक्षाचे रावसाहेब अंतापूरकर हे येथील आमदार होते. त्यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली असून येथून रावसाहेब यांचा मुलगा उमेदवारी करत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चांगली प्रचार यंत्रणा राबवलेली आहे, त्यामुळे या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष नक्की जिंकेल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन काही ठिकाणी सुरू आहे. राज्य सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्यही केल्या आहेत. पण, अजूनही काही विषय असतील तर मुंबईत गेल्यानंतर माहिती घेऊन यावर चर्चा करू, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

दरम्यान, देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (ता. 30 ऑक्टोबर) सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी बारापर्यंत 22 टक्के मतदान झाले होते. शहरासह ग्रामीण भागातही मतदारांनी उत्साहात मतदानात सहभाग घेतला असून काही ठिकाणी मतदारांनी रांगा लावून मतदानात सहभाग घेतला आहे. दुपारपर्यंत शहर व परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडला नसून मतदान अगदी शांततेत सुरू असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी सांगितले.

भाजपचे उमेदवार माजी आमदार सुभाष पिराजीराव साबणे यांनी देगलूर येथे सपत्नीक गंगुताई सुभाषराव साबने यांच्यासह मतदान केले. काँग्रेसचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी आई शीतलताई रावसाहेब अंतापूरकर यांच्यासह अंतापूर येथे मतदान केले. वंचित आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तमराव इंगोले यांनीही देगलूर येथे सपत्नीक मतदान केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT