shashikant shinde, dnyandev Ranjane
shashikant shinde, dnyandev Ranjane sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विजयाची खात्री असल्यानेच अजित पवारांनी जावळीतून लढण्यास सांगितले : ज्ञानदेव रांजणे

महेश बारटक्के

कुडाळ : जावळीच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी खासदार शरद पवारांनी मला कधीच फोन केला नव्हता. केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी माझी चर्चा झाली होती. त्यांना मी विजयाची खात्री असल्याचे सांगितल्याने त्यांनीच मला लढ असे सांगितले होते. माझ्या उमेदवारीची खरी ताकद ही जावळीतील जनता असून माझे सर्व मतदार व माझे नेते यांच्यामुळेच मी ही निवडणूक लढवली, असे स्पष्ट मत जावळी सोसायटीतील उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी व्यक्त केले.

जिल्हा बँकेच्या मतदानानंतर श्री. रांजणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आमदार शशिकांत शिंदे यांचा मी आदर करतो, ते तालुक्याचेच सुपुत्र आहेत. मात्र, मतदार जनतेनेच ही निवडणूक हातात घेतल्याने ही निवडणूक अटळ झाली. मला शरद पवार साहेबांनी माघारीसाठी कधीच फोन केला नव्हता. केवळ अजित पवार यांच्याशी माझी चर्चा झाली होती. मात्र, त्यावेळीही मी त्यांना मला विजयाची खात्री आहे, म्हणून मी निवडणूक लढवत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी मला लढ असे सांगितले होते.

मला अनेकांनी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही निवडणुकीची प्रक्रिया खुप पुढे गेली होती, तिथुन माघार घेणे मला शक्य नव्हते. जावळीच्या जनतेचा जनरेटा वाढल्याने माझा नाईलाज झाला, उद्या जरी मी निवडुन आलो तरी, मी शरद पवार व अजित पवार यांच्या विचारांशीच व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठीशी ठाम राहणार आहे. या निवडणुकीत कोणीही कोणाला गाफिल ठेवले नाही. तर उलट या तालुक्यात त्यांनीच ही परपंरा सुरू केली होती. त्यालाच त्यांना सामोरे जावे लागले.

जावळीतील प्रत्येक निवडणुकीत शशिकांत शिंदे यांनी आधीपासूनच लक्ष घालण्यास सुरूवात केल्याने त्यांच्या जावळीत लक्ष घालणार या वक्तव्याला काही महत्व नाही, असेही रांजणे यांनी नमूद केले. तसेच माझ्या उमदेवाराची खरी ताकद ही जावळीतील जनता असून माझे सर्व मतदार व माझे नेते यांच्यामुळेच मी ही निवडणुक लढवली, असेही ज्ञानदेव रांजणे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT