MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan : कॉरिडॉर एमआयडीसी म्हसवडमध्येच होणार... जयकुमार गोरे

सल्लाउद्दिन चोपदार

म्हसवड : "म्हसवडचा मुंबई- बंगळूर इंडस्ट्रीयल कॉरिडॉर एमआयडीसी कुठेही गेलेली नाही. ती म्हसवडमध्येच साडेआठ हजार एकरात होणार आहे. जर कोणी कॉरिडॉर एमआयडीसी गेली असे जर कोणी म्हणत असेल तर त्यांच्यावर विश्वासच ठेऊ नका" असे आवाहन माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.

राजेवाडी (ता. माण) येथील सदगुरु श्री. श्री. साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी आमदार गोरे बोलत होते. यावेळी माढाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार अनिल बाबर, माजी आमदार रामहरी रुपनवर, गुरुदेव शिवाचार्य प्रभू महाराज, शिवाचार्य माढेकर महाराज, गुरुदेव श्री.श्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्णवर, आप्पासाहेब पुकळे, संपतकाका पवार, डॉ.महादेव कापसे, दिलीप तुपे, कारखान्याचे संचालक उपस्थित होते.

आमदार गोरे म्हणाले, म्हसवड येथे बेंगळूर मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर एमआयडीसी मंजूर झाली आहे. या कॉरिडॉर एमआयडीसीसाठी दोन्ही बाजूंनी सुसज्ज रस्ते असुन याचा सातारा, सांगली, व सोलापूर या तीन जिल्ह्यांना निश्चित फायदा होणार आहे. इंडस्ट्रीज कंपन्या येणार असुन या भागाचा कायापालट होणार आहे.

यावेळी खासदार रणजित निंबाळकर यांनीही माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांचे नाव न घेता म्हसवडची कॉरिडॉर एमआयडीसी आम्हीच कोरेगाव भागात नेल्याचे बोलघेवडे प्रचार करीत असल्याची टीका करुन खरपुस समाचार घेतला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी म्हसवड भागात मंजूर झालेली बेंगलोर मुंबई कॉरिडॉर एमआयडीसी इतरत्र जाऊ देऊ नये, असे साकडे उपस्थितांना घातले.

म्हसवड भागात जर कॉरिडॉर एमआयडीसी उभारली गेली. तर माण, आटपाडी, सांगोला, माळशिरस या तालुक्यांचा विकास होईल, असे मत व्यक्त केले. रामहरी रुपनवर यांनीही बेंगलोर मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे सातारा, सांगली, सोलापुर या तिन्ही जिल्ह्यास निश्चितच फायदा होईल. यासाठी या तिन्ही जिल्ह्यातून एकत्रितपणे प्रयत्न करुया, असे आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT