Rajvardhan Naik Nimbalkar News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : भ्रष्टाचारी अमन कोल्हापुरात नकोच ; भाजपा जिल्हाध्यक्ष नाईक-निंबाळकरांनी दिला इशारा

BJP News : कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे.

Amol Jaybhaye

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यांच्या बदलीची मागणी जिल्ह्यात जोर धरत आहे. अशावेळी पुन्हा एका वादग्रस्त जिल्हाधिकाऱ्याची नेमणूक कोल्हापूर जिल्ह्यात होणार असल्याची कुनकुण भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांना लागली. त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी पदाचा वाद आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याची माहिती भाजप (BJP) जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापुरात अमन मित्तल यांनी कोव्हिड काळात 35 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप त्यांनी केला.

कोल्हापुरातून बदली झाल्यानंतर लातूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर असताना धोकादायक इमारतीवरून झालेली आर्थिक मागणी, अनेक प्रकरणात असलेले आर्थिक संबंध यामुळे त्यांची कारकीर्द वादग्रस्त आहे. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असताना देखील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीत असा भ्रष्ट आणि नंगानाच करणारा अधिकारी करवीर नगरीत नको, अशी मागणी नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

असा भ्रष्ट अधिकारी कोल्हापुरात आला तर त्या विरोधात जन आंदोलन उभे केले जाईल. याला पाठिंबा असणाऱ्या प्रतिनिधींचा खुलासा जनतेसमोर करणार असल्याचा इशारा निंबाळकर यांनी दिला आहे.

कोव्हिड काळात औषधी खरेदीच्या व्यवहारात अमन मित्तल यांनी 35 कोटीचा घोटाळा केल्याचे उघड झाले होते. त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या खरेदीत मोठी तफावत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. या संपूर्ण प्रकरणावरून निंबाळकर यांनी आवाज उठवला होता. दरम्यान, असला भ्रष्ट अधिकारी कोल्हापुरात नको. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटून निवेदन देणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.

राजू शेट्टी यांनी देखील दिला होता इशारा

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळत नाही म्हणून रुग्ण तडफडत आहेत, वारंवार सूचना करूनही अमन मित्तल त्याची दखल घेत नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या शेट्टी यांनी, जर दखल घेत नसाल तर मला तुमची सर्व प्रकरणे बाहेर काढावी लागतील, असा इशारा दिला होता.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT