MLA Mahesh Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'रयत' बद्दल प्रश्न उपस्थित केला, ही माझी चूक आहे का...

उद्धव ठाकरे Udhav Thackeray संस्थेचे अध्यक्ष President व्हावेत, ही मागणी केल्यानंतर काही लाभार्थ्यांच्या पोटात दुखायच कारण काय? 'रयत' ही महाराष्ट्राची Maharashtra संस्था आहे.

सरकारनामा ब्युरो

विसापूर : उद्धव ठाकरे संस्थेचे अध्यक्ष व्हावेत, ही मागणी केल्यानंतर काही लाभार्थ्यांच्या पोटात दुखायच कारण काय? 'रयत' ही महाराष्ट्राची संस्था आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केला ही माझी चूक आहे.'' माझ्या जिल्ह्यातल्या तरुणांना गुणवत्तेवर 'रयत'मध्ये नोकरी द्यावी, ही माझी मागणी चुकीची आहे का? असा प्रश्न कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

कटगुण (ता. खटाव) येथे कटगुण, काटकरवाडी, शिंदेवाडी, धावडदारे येथील एक कोटी ८४ लाखांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, भाजप जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव, कटगुणच्या सरपंच जयश्री गोरे, उपसरपंच जयदीप गायकवाड, बुधचे सरपंच अभय राजेघाटगे, प्रकाश जाधव, नितीन पाटील, नेरचे सरपंच सुरेश चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, ''ज्या कुटुंबातील लोकांनी रयत शिक्षण संस्थेत योगदान दिले, ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना संस्थेतून काढू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. उद्धव ठाकरे संस्थेचे अध्यक्ष व्हावेत, ही मागणी केल्यानंतर काही लाभार्थ्यांच्या पोटात दुखायच कारण काय? 'रयत' ही महाराष्ट्राची संस्था आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केला ही माझी चूक आहे.'' माझ्या जिल्ह्यातल्या तरुणांना गुणवत्तेवर 'रयत'मध्ये नोकरी द्यावी, ही माझी मागणी चुकीची आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महेश शिंदे म्हणाले, ''आज जिल्ह्याच्या हक्काच्या संस्था चालवतंय कोण? या प्रश्नाने जनता उद्विग्न झाली आहे. जरंडेश्वर साखर कारखानाही कालही आमचा मालकीचा होता. आजही आमचा आहे आणि उद्याही आमच्याच मालकीचा राहणार आहे. त्यामुळे आमचा आवाज कितीही दाबला तरी त्याचा फायदा होणार नाही. कारण जरंडेश्वर कारखाना आमच्या रक्ताच्या पैशातून उभा राहिलेला आहे. आम्ही ते विसरणार नाही. ज्या संचालकांनी स्वतःच्या घरावर कर्ज काढले त्या संचालकांचा ऊस राजकारण करून तोडला जात नाही. ही भूमिका चुकीची असून, या भूमिकेच्या विरोधात मी आवाज उठवत आहे. यासाठी तुम्ही सहकार्य करा.''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT