Praniti Shinde, Narsayya Adam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election: सोलापुरात मोठा ट्विस्ट; भाजपच्या जवळ गेलेले आडम मास्तर आता काँग्रेसचा प्रचार करणार, पण...

Solapur Lok Sabha Election: मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी सोलापूरमध्ये मध्य महाविकास आघाडीला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. पण यासाठी त्यांनी आघाडीला एक प्रस्ताव दिला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे राज्यातील राजकीय नेते राजकारणाची गणितं जुळवण्याची घाई करताना दिसत आहेत. राज्यातील मोठ्या पक्षांसह लहान पक्षदेखील या निवडणुकीत आपल्या पक्षाला काय फायदा होईल? याचा विचार करत आहेत. शिवाय प्रत्येकजण संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काही नेते आणि पक्ष आपल्या हक्काची मतं देऊन त्याच्या बदल्यात लोकसभेनंतर येऊ घातलेल्या विधानसभेसाठी उमेदवारी द्या; अशी मागणी मोठ्या पक्षांकडे करत आहेत.

अशातच आता मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने माजी आमदार नरसय्या आडम मास्तर (Narsayya Adam) यांनी महाविकास आघाडीने (MVA) सोलापूरमध्ये मध्य विधानसभा आम्हाला सोडावी, तर आम्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करू, अशी भूमिका घेतली आहे. प्रणिती शिंदेंच्या (Praniti Shinde) विरोधात निवडणूक लढवलेली असली तरी भाजप हा मुख्य विरोधक आहे. भाजपला हरवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला साथ देऊ, आमचे कितीही मतभेद असले तरी आम्ही प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी तन, मन आणि धन लावून प्रयत्न करू, फक्त त्यांनी सोलापूर विधानसभा (Solapur) आम्हाला सोडली पाहिजे, अशी मागणी नरसय्या आडम यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेस (Congress) आता आडम यांच्या प्रस्तावावर काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) जवळपास दीड लाख मतदार हे माकपचे सदस्य आहेत. आज देशाचे संविधान धोक्यात आहे, इलेक्ट्रोल बाँडचा इतका मोठा घोटाळा झाला आहे. आमचा विरोधक हा भाजप आहे. त्यामुळे सर्व मतभेद विसरून सोलापुरात काँग्रेसला साथ देऊ, असंही आडम यांनी म्हटलं आहे.

विधानसभेचे नंतर बघू आधी लोकसभेचा प्रचार करा

महाविकास आघाडीला मदत करण्यासाठी ज्याप्रमाणे माकपच्या नरसय्या आडम यांनी अट ठेवली आहे. त्याचप्रमाणे महायुतीमध्येही काही नेत्यांनी लोकसभेला काम करण्यासाठी विधानसभेचा शब्द द्या; अशी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. इंदापूर विधानसभेचा शब्द घेतल्याशिवाय लोकसभेचे काम करणार नाही, असा पवित्रा माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil) घेतला होता. दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यात काल चर्चा झाली. या चर्चेत पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर विधानसभेबाबतच्या शब्दासाठी आडलेल्या पाटलांना "विधानसभेसंदर्भात निर्णय वेळ आल्यावर घेऊ, आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा," अशा सूचना फडणवीसांनी दिल्याचं सांगितलं जात आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT