Dilip Walse Patil, Sp Ajay kumar Bansal
Dilip Walse Patil, Sp Ajay kumar Bansal sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यात गुन्हेगारी वाढली; गृहमंत्र्यांनी केल्या एसपींना काही सूचना...

Umesh Bambare-Patil

सातारा : सातारा जिल्ह्यात गुन्हेगारीचे चित्र समिश्र असून काही ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यासाठी काही उपाय योजना करण्याची सूचना आम्ही पोलिस अधीक्षकांना केलेल्या आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात याचा परिणाम दिसेल, असे स्पष्टमत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज साताऱ्यात आले होते. यावेळी शासकिय विश्रामगृहात त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

औंध पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधून पाच आरोपींनी पलायन केले होते. याविषयी त्यांना विचारले असतो ते म्हणाले, ''काल संध्याकाळीच मी पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात जाऊन या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला आहे. सातारा जिल्ह्यात समिश्र चित्र असून काही क्षेत्रात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्या दृष्टीकोनातून काही गोष्टी करायला सांगितल्या आहेत. पुढील आठवड्यात याचा परिणाम दिसेल. ''

औंध पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधून पाच आरोप पळाले आहेत. त्यापैकी एकाला पकडलेले आहे. उर्वरित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. लवकरच सर्व आरोपी लॉकअपमध्ये दिसतील.'' ग्रामीण भागात महिलांवर व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, ते नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाय सूचविणार आहात, याविषयी ते म्हणाले, ''याविषयी मी अधिक जाहीरपणाने बोलणार नाही, पण यासंदर्भात मी पोलिस अधीक्षक व आयजींना काही सूचना केल्या आहेत.'' खासदार उदयनराजेंनी तुमची आज भेट घेतली, याविषयी विचारले असता ते म्हणाले, ''सातारा शहरातील वाहतूकीच्या संदर्भात तसेच इतर प्रश्नांबाबत त्यांनी माझ्याशी चर्चा केली.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT