-इम्रान शेख
Koregaon NCP New : रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन करणारा बॅनर झळकल्याने राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष सुनील माने नक्की कोणाच्या बाजूने आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील हे शरद पवार यांच्यासोबत असल्याचे काल दिसून आले. त्यामुळे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष हे व्दीधामनस्थितीत असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार Ajit Pawar व इतर आठ आमदारांनी शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. आता अजित पवार यांच्यासोबत नक्की कोण व शरद पवार Sharad Pawar यांच्यासोबत कोण याबाबत सर्वसामान्यामध्ये कुतूहलाचे वातावरण आहे. होणाऱ्या प्रत्येक घटनांवर व बोलणाऱ्या प्रत्येक वाक्याचा सर्वसामान्यांमधून विचार करून अंदाज बांधला जात आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने हे रहिमतपूरमध्येच राहतात. त्यातच रहिमतपूर शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारा बॅनर झळकला आहे. आत्तापर्यंत माध्यमांच्या समोर न आल्याने सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने नक्की कोणासाोबत आहेत, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. पण, झळकलेल्या बॅनरने सर्व काही उघड केलं. मात्र परंतु दुपारनंतर पुन्हा हा बॅनर उतरवण्यात आला.
याबाबत जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याकडून माहिती घेतली असता, आरोग्याच्या कारणास्तव दोन दिवसांपासून ते दवाखान्यात असून लावण्यात आलेल्या बॅनर विषयी त्यांना काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत उद्या रहिमतपूर शहरात आल्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बॅनर कोणी लावला याबाबत माहिती घेऊ, असे त्यांनी सांगितले. परंतु ते कोणासोबत आहेत हे अजूनही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.