MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : डाॅल्बी वाजलीच पाहिजे... दोन तासांत काय आभाळ कोसळणार का... उदयनराजे भडकले

Umesh Bambare-Patil

सातारा : गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे डॉल्बी चालक आणि त्यांचे कुटुंबिय आर्थिक विवंचनेत आहेत. त्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. मग, गणेशोत्सवात साताऱ्यात डॉल्बी का वाजू नये, याचे प्रशासनासह पोलिसांनी उत्तर द्यावे, असा रोखठोक सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

डॉल्बीच्या मुद्द्यावर जिल्हा प्रशासन व खासदार उदयनराजे भोसले आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात काही कामानिमित्त खासदार उदयनराजे यांनी बैठका घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

उदयनराजे म्हणाले, " साताऱ्यात डॉल्बी सिस्टीम वाजलीच पाहिजे. पोलिसांनी प्रशासनाला डॉल्बी का नको आहे. याचे त्यांनी आम्हाला पहिल्यांदा उत्तर द्यावे. सातारा जिल्ह्यात डॉल्बी वाजवली जावी, याकरिता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. तेव्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी डॉल्बीला सशर्त परवानगी दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले. मात्र, नंतर पोलिसांनी यू टर्न घेत डॉल्बीला परवानगी नाहीच, अशी भूमिका मांडली.

उदयनराजे म्हणाले, व्यवसायिकांच्या कुटुंबीयांचा प्रशासनाने एकदा तरी विचार केला पाहिजे. त्यांनी मोठ्याप्रमाणात गुंतवणूक केली आहे. डॉल्बीवर बंदी घातल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे. सातारा शहरात डॉल्बीला बंदी आणि इतर ठिकाणी डॉल्बी मात्र जोरजोरात वाजते, असा दुटप्पीपणा व्हायला नको.

सातारा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनाने डॉल्बीला परवानगी का नाही, याचे पत्र काढावं. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक घटकाचा विचार करून निर्णय घेतले पाहिजे. डॉल्बी वाजलीच पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. दोन-तीन तासाने असं काय आभाळ कोसळणार आहे, असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT