Dattatraya Bharane-Ujani dam .jpg
Dattatraya Bharane-Ujani dam .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरकरांनो, गैरसमज करून घेऊ नका; ‘ती’ योजना जुनीच : भरणे

प्रमोद बोडके

सोलापूर : इंदापूर (Indapur) तालुक्‍यासाठी मंजूर झालेल्या लाकडी-निंबोडी योजनेचा आणि सोलापूरच्या (Solapur) पाण्याचा काहीही संबंध नाही. कृपया करून सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नये आणि प्रसार माध्यमांनीही गैरसमज पसरवू नये, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी केले. (Dattatrey Bharane gives explanation about Lakdi Nimbodi scheme in Indapur)

आषाढी यात्रेची नियोजन बैठक, खरिप हंगाम तयारी बैठक घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे आज (ता. १३ मे) सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सात रस्ता येथील नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी पालकमंत्री भरणे बोलत होते. त्यावेळी त्यांनी लाकडी-निंबोडी पाणी योजनेबाबत स्पष्टीकरण दिले.

पालकमंत्री भरणे म्हणाले, यंदाची वारी ही कोरोनाच्या नियमाच्या बंधनातून मुक्त होणार आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापेक्षा जास्त वारकरी या वर्षी आषाढी वारीसाठी येणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाने सर्व तयारी करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. दरवेळी १० ते १२ लाख वारकरी पंढरपुरात येत असतात. यंदा १५ लाख वारकरी येऊ शकतील, या अंदाजाने नियोजन करण्यात येत आहे. आषाढी वारीच्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरु आहे. वारकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन उपाय योजना केल्य जात आहेत, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. खरिपाच्या पार्श्‍वभूमीवरही शेतकऱ्यांना मुबलक खते व बियाणे यांचा पुरवठा व्हावा अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

दरम्यान, इंदापूर तालुक्‍यातील दहा गावे आणि बारामती तालुक्‍यातील ७ गावांच्या शेतीच्या पाण्यासाठी १९९५ पासून लाकडी-निंबोडी योजनेची मागणी होत होती. या मागणीला पालकमंत्री भरणे यांच्या पुढाकाराने यश आले आहे. या योजनेच्या अंदाजपत्रकास राज्य सरकारने ३४८ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेमुळे सोलापूर जिल्ह्याचे उजनीतील पाणी कमी होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री भरणे यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. ही योजना जुनी आहे. या योजनेसाठी पूर्वीच पाण्याची तरतुद झालेली आहे. त्यामुळे या योजनेबद्दल सोलापूर जिल्ह्याने गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT