Chandrakant Patil & Rohit Pawar

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

रोहित पवार व चंद्रकांत दादांत खडाजंगी

भाजप ( BJP ) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी ट्विट करताच रोहित पवारांनी प्रतिउत्तर दिले.

Amit Awari

अहमदनगर : कर्जत नगर पंचायतची निवडणूक सुरू आहे. ही निवडणूक भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde )राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राष्ट्रवादीच्या गोटात जात असल्याने भाजप ( BJP ) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करताच रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातूनच प्रतिउत्तर दिले. Debate between Rohit Pawar and Chandrakant Dada

ट्विटमध्ये चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे, की कर्जत नगरपंचायत निवडणुकीत ऐनवेळी भाजप उमेदवाराचा पाठिंबा मिळवण्याची वेळ राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांच्यावर आली. हा त्यांचा निवडणुकीपूर्वीच झालेला पराभव आहे. शरद पवार यांचा वारसा, राज्यात सत्ता, उपमुख्यमंत्री अजित पवार असूनही रोहित पवार यांना एकेका जागेसाठी झुंजावे लागते.

याचाच अर्थ जनता भाजपसोबत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे. सत्तेचा दुरूपयोग आणि धनशक्ती विरोधात ही निवडणूक असली तरी जनशक्ती आपल्याकडे आहे. माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार संघर्ष करा, असे माझे तेथील कार्यकर्त्यांना आवाहन आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटलांच्या ट्विटला लगेच आमदार रोहित पवार यांनी उत्तर देत म्हटले आहे की, चंद्रकांत दादा आपण ज्येष्ठ नेते आहात. त्यामुळे आपल्याविषयी मला आदर आहे. पण मी हे समजू शकतो की, नाईलाजाने तुम्हाला हे ट्विट करावं लागतंय. कर्जतमधील भाजप उमेदवारांना मी का घेतलं यापेक्षा ते माझ्याकडे का आले? हे तुम्ही समजून घेण्याची खरी गरज आहे. राहिला प्रश्न तुमच्या इतर मुद्द्यांचा.... तर ते तुम्ही लिहिलं असेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे, पण तुम्हाला लिहून दिलं असेल तर त्याचा विचार करायची गरज नाही. आमचा लोकशाहीवर आणि इथल्या मायबाप जनतेवर विश्वास आणि प्रेम आहे. घोडामैदानही जवळच आहे.

रोहित पवार यांनी पुढे म्हटले आहे की, तुम्ही कर्जत नगरपंचायत आणि इथल्या नागरिकांच्या भविष्याबाबत चिंता करण्याची गरज नाही. तसंच धनशक्तीच्या बळावर लोकांना पक्षात घेता येतं असं तुमचं म्हणणं असेल तर आजवर तुम्ही ज्यांना भाजपमध्ये घेतलं ते धनशक्ती आणि ईडी सह इतर केंद्रीय यंत्रणांच्याच बळावर, असाच याचा अर्थ नाही का होत?, असा प्रतिप्रश्न रोहित पवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT