chandrakant Patil, Satej patil
chandrakant Patil, Satej patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

24 तासांत निर्णय घ्या : चंद्रकांतदादांची सतेज पाटलांना ऑफर

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : कोल्हापूरची पोटनिवडणूक भाजपने लादल्याचा आरोप पालकमंत्री सतेज पाटील करत आहेत. मात्र, त्यांनीच ही निवडणूक लादली आहे. अजूनही २४ तास शिल्लक आहेत. जयश्री जाधव या भाजपच्या होत्या त्यांना परत भाजपमध्ये द्या. मी एबी फॉर्म बदलतो आणि ही निवडणूक बिनविरोध करतो, अशी ऑफर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला दिली.

कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी भाजपच्यावतीने उमेदवार सत्यजित कदम यांचा अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत आम्ही कामाच्या जोरावर ही निवडणूक जिंकणार असल्याचे सांगितले. ही निवडणूक लादण्यावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावर चंद्रकांत पाटील यांनीच ही निवडणूक लादल्याचा आरोप मंत्री सतेज पाटील यांनी केला होता.

त्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ही निवडणूक मी लादलेली नाही तर काँग्रेसनेच ही निवडणूक लादली आहे. पण, अजूनही 24 तास शिल्लक आहेत. जयश्री जाधव या भाजपाच्या होत्या त्यांना परत भाजपामध्ये पाठवा. आम्ही ही निवडणूक बिनविरोध करतो. शिवाय सत्यजित कदम यांना मनवून एबी फॉर्म बदलतो, असे सांगत ही निवडणूक बिनविरोध करतो, अशी ऑफर दिली. दरम्यान, जयश्री जाधव यांनी सुद्धा आपण चंद्रकांत पाटील यांना विनंती केली होती. आपले पती चंद्रकांत जाधव यांनी जो झेंडा हाती घेतला होता, त्याच काँग्रेसमधून पुढे काम करणार असल्याचे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT