deepak salunkhe sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Deepak Salunkhe : दीपकआबा देणार शहाजीबापूंना टक्कर, ‘मशाल’ पेटवणार; सांगोल्यात शेकाप बंडखोरी करणार?

Sangola Assembly Constituency : दीपकआबा साळुंखे यांचा ‘मातोश्री’वर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

Akshay Sabale

Sangola News: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सोलापूर जिल्ह्यात धक्क्यांवर धक्के बसत आहेत. सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी विधानसभा मैदानात उतरणार असल्याचं सांगत राजीनामा दिला होता. आता दीपक साळुंखे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे साळुंखे हे विधानसभेला सांगोल्यात ‘मशाल’ पेटवणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये शहाजीबापू पाटील शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. शहाजीबापू पाटील यांना त्या निवडणुकीत दीपक साळुंखे यांनी पाठिंबा दिला होता. 'शेकाप' आणि राष्ट्रवादीची युती होती. तरी, सांगोल्यात साळुंखे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन शहाजीबापू पाटील यांना ‘सपोर्ट’ केला होता. त्या निवडणुकीत पाटील यांनी 764 मतांनी 'शेकाप'च्या अनिकेत देशमुख यांचा पराभव केला होता.

आताच तेच दीपक साळुंखे ( Deepak Salunkhe ) यांनी शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी दंड थोपटले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. मात्र, महायुतीतून ही जागा शहाजीबापू पाटील यांना सुटणार असल्यानं दीपक साळुंखे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता.

आता उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या उपस्थितीत दीपक साळुंखे हे ‘मशाल’ हाती घेणार आहेत. ‘मातोश्री’ येथे दीपक साळुंखे यांचा प्रवेश होणार आहे. उमेदवारीच्या शब्दावरच साळुंखे हे ठाकरे गट प्रवेश करत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगोल्यात दीपक साळुंखे विरुद्ध शहाजीबापू पाटील, अशी 'टफ फाइट' होऊ शकते.

शेकाप काय करणार?

सांगोला हा 'शेकाप'चा बालेकिल्ला आहे. 'शेकाप' महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. येथून बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख हे दोन्ही बंधू 'शेकाप'कडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. आता मात्र दीपक साळुंखे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत ‘एन्ट्री’ केली आहे. ठाकरेंची शिवसेनाही सांगोल्यावर दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘शेकाप’ बंडखोरी करणार की थंड बसणार? याकडे सगळ्यांचं लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT