Rajan patil
Rajan patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

माजी आमदार राजन पाटलांची बदनामी; अनगरमधील एकावर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो

मोहोळ (जि. सोलापूर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (rajan patil) यांच्या विषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी अनगर (ता. मोहोळ) येथील एकाच्या विरोधात मोहोळ (mohol) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत भागवत माने असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे मोहोळ तालुक्‍याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Defamation of former MLA Rajan Patil; Filed a case against youth)

प्रशांत भागवत माने हा गेल्या काही महिन्यांपासून अनगर (ता. मोहोळ) गावात राहत नाही. गेल्या वर्षभरापासून मात्र तो सोशल मीडियाद्वारे माजी आमदार राजन पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. माजी आमदार पाटील हे हुकूमशाही करत असल्याचे माने याने ता. 17 जानेवारी रोजीच्या आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.

या प्रकरणी सुधीर अरुण काकडे (रा. अनगर) यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार प्रशांत भागवत माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक सचिन मुसळे तपास करीत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. उमेश पाटील हेही पाटील यांच्यावर थेट आरोप करत आहेत. तसेच, राजन पाटील गटाकडून उमेश पाटील यांच्या समाचार घेतला जात आहे. राष्ट्रवादीतील दोन गट एकमेकांना भिडत असल्याने पक्षाची व कार्यकर्त्यांची अवस्था मात्र बिकट झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT