Birbe karad sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : पन्नास हजारांची लाच मागितली; कराडातील लोकसेवकांवर गुन्हा दाखल...

तक्रारदार यांच्या भाचीचा तहसीलदार कार्यालय Tahashil office येथील संबंधित यांना सांगून कुणबी जातीचा दाखला Kunbi certificate काढून देतो, असे सांगून लाचेची Bribe मागणी केली होती.

हेमंत पवार

कऱ्हाड : तक्रारदाराच्या भाचीचा कुणबी असल्याचा दाखल्याचे काम संबंधित अधिकाऱ्याकडून करून देतो, असे सांगून ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याबद्दल तहसील कार्यालयातील लोकसेवकावर सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्या अनुषंगाने त्याच्यावर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम वसंत शिवदास (वय ४३, मूळ रा. मालखेड, ता. कऱ्हाड), सध्या (रा. ढेबेवाडी फाटा मलकापूर, ता. कऱ्हाड) असे कारवाई केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांची माहिती अशी, तक्रारदार यांच्या भाचीचा तहसीलदार कार्यालय येथील संबंधित यांना सांगून कुणबी जातीचा दाखला काढून देतो, असे सांगून स्वतःकरिता व संबंधित अधिकारी यांच्याकरिता ५० हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

त्या अनुषंगाने त्याच्यावर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपआयुक्त राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव, पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलिस अंमलदार संजय कलगुडगी, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले यांनी कारवाई केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT