MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार गोरेंना तत्काळ अटक करा!

संजय जगताप

मायणी : मयत व्यक्तीच्या नावे संगनमताने बोगस कागदपत्रे बनविणे, मूळ कागदपत्रांत छेडछाड करणे, बोगस आधारकार्ड, प्रतिज्ञापत्र तयार करून जमीन हडप करण्याचे कुटील कट-कारस्थान रचून अनुसूचित जातीच्या घटकांची फसवणूक करणे. आदी बेकायदेशीर कृत्याबद्दल आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अद्याप त्यांना पोलिसांनी अटक केलेली नाही.

गोरेंना तत्काळ अटक करावी. अन्यथा सोमवारी (ता.२५ एप्रिल) जनता क्रांती दल व समविचारी संघटनांना बरोबर घेऊन वडूज तहसील कचेरीवर हल्लाबोल आंदोलनाचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला. याबाबतचे लेखी निवेदन आज (ता. 19 एप्रिल) जनता क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्यानी खटाव तहसीलदारांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, मायणीतील महादेव भिसे यांचे वडील पिराजी विष्णू भिसे हे २०२६ मध्येच वृध्दापकाळाने मयत झालेत. तरीही त्यांच्या जागी कोणीतरी अज्ञात इसम उभा करून त्याचे बनावट आधारकार्ड तयार करून माण-खटावचे आमदार व त्यांचे इतर कार्यकर्त्यांनी शंभर रूपयांचे स्टॅम्पवरती बोगस प्रतिज्ञापत्र तयार केले. पिराजी भिसे यांच्या मूळ आधारकार्डाची छेडछाड करून बनावट आधारकार्ड तयार केले. आमदार गोरेंनी सहकाऱ्यांशी संगनमत करून मयत भिसेंच्या ठिकाणी दुसऱ्याच व्यक्तीला उभे करून भिसे कुटुंबियांची फसवणूक केली आहे. भिसे कुटुंबीयांच्या राहत्या घरावरही त्यांनी टाच आणली असून राहती घरं पाडण्याचा मोठा डाव आखला आहे. ही बाब गंभीर, लाजीरवाणी आणि मानवतेला काळीमा फासणारी आहे. मात्र, सुदैवाने गोरे यांचे पितळ लवकर उघडे पडले असून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्याप गोरेंना पोलिसांनी अटक केली नाही. गोरेंना तत्काळ अटक झाली नाही तर सोमवारी वडूज तहसिल कचेरीवर 'हल्लाबोल' आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने, गणेश भिसे, विकास सकट, दत्ता केंगार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT