Devendra Fadnavis, Ram Shinde, Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Politics: फडणवीसांच्या शेजारच्या खुर्चीवर विखे बसले अन्‌ राम शिंदे व्यासपीठावरून खाली निघाले; पण....

Ram Shinde vs Radhakrishna Vikhe Patil : नगरमध्ये भर कार्यक्रमात फडणवीसांसमोरच मान-अपमान नाट्य; फडणवीसांनी मोठेपणा दाखवत...

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar BJP : गेल्या काही दिवसांपासून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यात वाद सुरु आहे. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदेंनी विखेंवर गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून नगर भाजपातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. अशातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यादरम्यान राम शिंदे-विखे पाटलांमधील वादावर फडणवीसांनी थेट भाष्य केलं आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, "दोघांना सोबत घेऊन बसलो ना. समन्वय आहेच. काही काळजी करु नका. काही वाद नाहीत. वाद असले तरी वादळ नाही. चिंता करु नका. चहाच्या पेल्यातील वादळ आता संपलेलं आहे", अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या दौऱ्यादरम्यान, एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच चांगलच मान-अपमान नाट्य रंगल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे या प्रकाराची सध्या एकच चर्चा सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

नगर जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बैठकीवेळी स्टेजवर राम शिंदे यांना खुर्ची न मिळाल्याने ते स्टेजवरून खाली निघाले. पण तेवढ्यात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पुन्हा स्टेजवर बोलावत त्यांच्या शेजारी खुर्ची उपलब्ध करून देत बसण्याची विनंती केली.

यावेळी फडणवीस यांच्या एका बाजूला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि दुसऱ्या बाजूला आमदार राम शिंदे हे होते. दरम्यान, या मान-अपमान नाट्याची सध्या जिल्ह्यात एकच चर्चा रंगली आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT