Satara, 01 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १२ जागांसाठी आज (ता. 01 नोव्हेंबर) मतदान होत आहे. मंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजप नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदानानंतर प्रतिक्रिया देताना सर्वाधिक मतदान असूनही मला कमी जागा घ्याव्या लागल्या अशी खंत व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी दिलेले जबाबदारी पार पाडली, असेही नमूद केले.
सातारा जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी ९ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १२ जागांसाठी आज जिल्ह्यातील ११ केंद्रावर मतदान होत आहे. सुमारे २ हजार २१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुकीची जबाबदारी भाजपने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सोपवली होती. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार स्वतःला निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्यानंतरही मंत्री भोसले यांनी सर्वांना सोबत घेऊन महायुतीचे पॅनेल उभे केले आहे. त्या पॅनेलकडे बॅंकेची सत्ता येणार, हे निश्चित आहे. मात्र, अनेक रुसवे फुगवेही या निवडणुकीच्या काळात दिसून आले.
खुद्द शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी पार पाडल्यानंतर आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी पार पाडली आहे. पण, साताऱ्याचे सर्वाधिक मतदान असून समतोल साधण्यासाठी कमी जागा घेतल्या, अशा शब्दांत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
ते म्हणाले, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदान केंद्राला भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, जिल्हा परिषदेच्या वेळी जो संघर्ष झाला, तो जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत होऊ नये, अशी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची अपेक्षा होती. तशा सूचनाही आम्हाला मिळाल्या होत्या.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष राज्यात एकत्र असल्यामुळे जिल्ह्यातही तसेच वातावरण राहिले पाहिजे यासाठी प्रयत्न करताना मला काही बाबतीत माघार घ्यावी लागली आहे. साताऱ्याचे मतदान सर्वात जास्त असतानाही समतोल राहण्यासाठी मी कमी जागा घेतल्या, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्याचं काम केलं, अशी प्रतिक्रिया शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.