पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यातील अखिल भारतीय ब्राह्मण (Brahman) महासंघासोबतच विविध ब्राम्हण संघटनांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. आज (21 मे) पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय इथे सायंकाळी ५ वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''पवार साहेबांना ब्राह्मण समाजाची आठवण झाली बरं झालं. आनंद आहे इतक्या वर्षांनी पवार साहेबांना ब्राम्हणांची आठवण आली आहे.सर्वांना बैठक बोलवण्याचा अधिकार आहे व कोणत्याही समाजाची बैठक बोलवण्याचा अधिकार आहे." असा खोचक तोल देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
एकीकडे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून ब्राह्मण समाजाबाबत करण्यात आलेली वक्तव्ये आणि दुसरीकडे शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येणारी मतं यामुळे दुषित झालेलं वातावरण निवळण्याचा आणि काहीशी साखरपेरणी करण्याचा प्रयत्न बैठकीच्या माध्यमातून होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र शरद पवार यांच्या या बैठकीला जायचे की नाही यावर ब्राह्मण संघटनांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. परशुराम सेवा संघ, ब्राह्मण महासंघ या संघटनांनी या बैठकीला जाणार नसल्याचे सांगत चर्चेवर बहिष्कार घातला आहे. ब्राह्मण महासंघाचा कोणताही पदाधिकारी या बैठकीला जाणार नसल्याचे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी स्पष्ट केले आहे. तर अन्य संघटना या बैठकीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, गडकरी पुतळे, पुणेरी पगडी, संभाजी ब्रिगेड, श्रीमंत कोकाटे, बाबासाहेब पुरंदरे हे जुने विषय जरा बाजूला ठेवू. पण अगदी परवाच्या प्रकरणानंतर शरद पवार यांनी आमदार अमोल मिटकरी यांना त्यांचे वक्तव्य माघार घ्यायला सांगायला हवे होते. उलट दुसऱ्या दिवशी त्यांनी शाहू महाराज आणि ज्योतिष यांची गोष्ट सांगितली. त्याच व्यासपीठावर त्यांच्याच उपस्थितीत मंत्री छगन भुजबळ यांनी पुरोहित हे धंदा करतात (व्यवसाय नाही) हा शब्द वापरत पुन्हा टिंगल केली आणि आरक्षणाचं चुकीचं उदाहरणं दिल्याचं आनंद दवे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.