Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Devendra Fadnavis: फडणवीसांनी वाढवला ट्विस्ट; राज्यसभेची जागा अजित पवार गटाला? म्हणाले, 'निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेणार..!'

Umesh Bambare-Patil

Satara BJP News : राज्यसभेच्या दोन जागा आमच्याकडे असून यातील एक जागा भाजपकडे राहणार आहे. व दुसरी जागा ही अजित पवार यांच्या गटाला देण्याचे यापूर्वीच ठरलेले आहे. त्यामुळे याबाबत पार्लमेंटरी बोर्ड योग्य तो निर्णय ठरवेल, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

त्यामुळे राज्यसभेच्या रिक्त जागेबाबतचा ट्विस्ट वाढला आहे. अजित पवार गटाचे सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेण्याच्या मार्गात भाजप अडथळा करणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (ShivendraRaje Bhosale) यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी राज्यसभेच्या जागेविषयी त्यांना विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्याकडे सध्या दोन राज्यसभा आहेत. त्यामध्ये एक राज्यसभा ही भाजपकडे राहील.

दुसरी राज्यसभा ही अजित पवार यांच्या गटाला देण्याचे यापूर्वी ठरलेला आहे. त्यामुळे याबाबत आमचे पार्लमेंटरी बोर्ड योग्य तो निर्णय ठरवेल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार गटाचे सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेतले जाणार हे निश्चित झाले आहे.

दरम्यान, आज वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सुरुची या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांची विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामुळे नितीन पाटील यांच्या खासदारकीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार हे यातून स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासाठी राज्यसभेच्या जागेची मागणी केली होती.

लोकसभा निवडणुकीदरम्यान वाई शहरांमध्ये झालेल्या अजित पवार यांच्या जाहीर सभेत अजित पवार यांनी सुद्धा नितीन पाटील यांनाच राज्यसभेवर घेण्याचा शब्द दिला होता. भाजप कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनीही जाहीर कार्यक्रमात भाजपची राज्यसभा ही भाजपकडेच राहावी, अशी मागणी केली. तर, देवेंद्र फडणवीस यांनी आमचे पार्लमेंटरी बोर्ड याबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे सांगून राज्यसभेच्या रिक्त जागेवर असलेला ट्विस्ट वाढविला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT