Satara BJP News : खासदार उदयनराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे यांच्या उमेदवारीबाबत भाष्य टाळले.
'भाजपामध्ये पक्ष शिस्त महत्त्वाची असून महायुतीचे जागा वाटप झाल्यावर पक्षश्रेष्टी निर्णय घेतात. त्यामुळे उमेदवारीबाबत कधीही अशी घोषणा करता येत नाही, सस्पेन्स ठेवला जातो.' असे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या दिमाखात साजरा झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार उदयनराजे यांना त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी येऊन शुभेच्छा दिल्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना तलवार भेट दिली दरम्यान वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी माणच्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी थेट साताऱ्यात येऊन खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसवर येत उदयनराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणीस यांनी खासदार उदयनराजे(Udayanraje Bhosale) यांच्या उमेदवारी संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अधिक बोलणे टाळले. सध्या लोकसभेचे निवडणुकीचे वारे वाहत असून अनेक जणांनी उमेदवारी जाहीर झाली असे समजून प्रचारास सुरुवात केली आहे.
मात्र याच पार्श्वभूमीवर उदयनराजेंबाबत आपण काही घोषणा करणार आहात का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले 'भाजपामध्ये पक्षशिस्त महत्वाची असते. महायुतीच्या जागा वाटपाबाबतची चर्चा अद्याप झालेली नाही. जागा वाटपाची चर्चा झाल्यावर पक्षश्रेष्ठी याबाबतचा निर्णय घेतात. त्यामुळे उमेदवारीबाबत मला घोषणा करता येत नाही, सस्पेन्स ठेवावा लागतो.' तसेच सध्या उमेदवारीबाबत काही नावांच्या चर्चा सुरू आहेत, त्याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, अशा चर्चा होत असतात, मीडियातून अशा सर्वाधिक चर्चा होतात.
उदयनराजेंनी लोकसभेच्या प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण केली आहे, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, याचे उत्तर मी आधीच दिले आहे. असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. पण उदयनराजे यांच्या पाठीशी माझ्या शुभेच्छा कायमच आहेत. आमचे त्यांचे जवळचे संबंध आहेत, त्यामुळे माझ्या शुभेच्छा नेहमी त्यांच्या पाठीशी राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.