Solapur, 11 May : माजी महापौर (स्व.) महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली एकाच पक्षात आणि एकाच प्रभागातून निवडून आलेले दोन नेते म्हणजे आमदार देवेंद्र कोठे आणि शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे. हे दोघे नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्या दोघांमधून विस्तवही जात नाही. मात्र, नुकतेच झालेल्या एका विवाह सोहळ्यात हे दोघे एकत्र आले होते. दोन राजकीय विरोधकांचे हातात हात पाहून अनेकांना आर्श्चयाचा सुखद धक्का बसला.
अमोल शिंदे आणि देवेंद्र कोठे हे मागील महापालिका निवडणुकीत एकाचा प्रभागातून निवडून आले होते. त्यामुळे हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र, देवेंद्र कोठे यांनी भाजपत प्रवेश केला आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आमदारकी जिंकली. त्यानंतर पुढे कोठे हे भाजपचे शहरातील प्रमुख नेत्यांपैकी एक बनले.
दुसरीकडे अमोल शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बनले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत या दोन्ही नेत्यांच्या हाती आपापल्या पक्षाची महत्वाची सूत्रे हेाते. महापालिकेत भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत युती न करता स्वबळावर निवडणूक लढवली होती.
महापालिका निवडणुकीत जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी एकट्याने शिवसेनेची खिंड लढवली होती. सर्वार्थाने बलाढ्या असलेल्या भाजपला आणि त्यांच्या नेत्यांना शिंगावर घेण्याचे धाडस केवळ अमोल शिंदे यांनी दाखवले होते. शिंदे यांनी कोठे यांच्याबरेाबर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते.
महापालिका निवडणुकीतील प्रचारामुळे या दोन युवा नेत्यांमध्ये कमालीची कटुता निर्माण झाली होती. अमोल शिंदे यांनी थेट २०२९ मध्ये सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून माझं आव्हान असेल, असे थेटपणे ललकारले होते. त्यामुळे दोघांमधील वाद कुठपर्यंत जाणार, अशी चर्चा शहरात अधून मधून होत असतानाच नुकत्याच झालेल्या एका लाग्नात हे देान्ही नेते हातात हात घालून स्टेजवर उभे होते.
देवेंद्र कोठे आणि अमोल शिंदे यांचे एकमेकांसोबत हातात हात उभे असलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्याची चर्चाही शहरात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.