Kolhapur News, 06 Sep : मनसेच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाडिक व मनसेमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. शिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कृष्णराज यांना सल्ला दिला आहे.
सध्या दोन्ही गटातील वाद महाराष्ट्रभर गाजत असताना कृष्णराज महाडिक यांचे वडील राज्य सभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी बोलायच्या ओघात आश्चर्यकारक वक्तव्य केले आहे. कोल्हापुरच्या जनतेने महाडिक परिवाराला खूप काही दिले आहे, असे सांगत असतानाच हा प्रकार घडला.
कोल्हापूरातील ऐतिहासिक दसरा चौक येथे धनंजय महाडिक युवाशक्ती यांच्या वतीने दहीहंडी यां कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी यां कार्यक्रमात खासदार महाडिक काय बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले असते. यंदाही त्यांचे एका वाक्याने हे भाषण पुन्हा एकदा चर्चेत आले. पण भाषण झाल्यानंतर ही चूक लक्षात आल्यानंतर समाज माध्यमातून हे व्हिडिओ हटवण्यात आले.
कोल्हापूरच्या जनतेने महाडिक कुटुंबाला भरभरून दिले आहे. मला तुमच्यासमोर नतमस्तक व्हायचं आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतकी मोठी जबाबदारी कृष्णराज महाडिकवर सोपवली आहे.
त्यांनी कृष्णराजला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष करून टाकले आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून जबाबदारी दिली. त्याच्यावर किती प्रेम आहे बघा, अशा शब्दात त्यांनी वक्तव्य केलं, त्यांनी थेट काँग्रेस युवक अध्यक्ष असा उल्लेख केल्याने वडिलांनाच मुलाच्या पदाचा आणि पक्षाचा विसर पडला की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यां व्यासपीठावरून बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळ दूध संघांचे रणशिंग फुंकले. महायुती म्हणून ही निवडणूक होतं असताना 25-0 असा निकाल लागेल. असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.