Dhananjay Munde
Dhananjay Munde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

धनंजय मुंडे म्हणाले, मी भगवानगडाचा निस्सीम भक्त...

सरकारनामा ब्युरो

शेवगाव ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्ह्यातील शिंगोरी (ता. शेवगाव) येथील 88 व्या नारळी सप्ताहाच्या समाप्ती सोहळा आज झाला. या सोहळ्यासाठी राज्यातील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. या प्रसंगी मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी संत भगवानबाबा यांच्या विषयी भावोद्गार काढले. ( Dhananjay Munde said, I am an ardent devotee of Bhagwangada ... )

संत भगवानबाबा यांनी समाजाला एकत्रित करून वैचारिक प्रबोधन करण्यासाठी अध्यात्म मार्गाचा अवलंब करत भगवानगडाच्या माध्यमातून नारळी सप्ताहाची परंपरा सुरू केली. याच परंपरेचा भाग असलेल्या 88 व्या नारळी सप्ताहाची सांगता आज भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री सानप यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाले. धनंजय मुंडे यांनी आपण अध्यात्मिक व्यासपीठावरून भाषण करण्याचे टाळतो असे सांगितले, मात्र उपस्थित जनसमुदयाने आग्रह केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी भगवानगडा प्रती आपल्या श्रद्धेबाबत संबोधन केले.

मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, संत भगवानबाबा यांच्या शिक्षण प्रसार, भक्ती मार्ग तसेच अध्यात्मातून प्रगतीचा मार्ग शोधणे या विचारसरणीचा मी पाईक आहे. भगवानगड हे आमचे श्रद्धास्थान आहेत. मी भगवानगडाचा निस्सीम भक्त आहे. या गडावर 18 पगड जातीचे लोक दर्शनासाठी येतात, त्यांना गडाची ऐश्वर्यसंपन्न महती अनुभवता यावी तसेच गडाच्या माध्यमातून उच्च शिक्षण, अध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना बळकटी मिळावी व गडाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्हाला योगदान देता यावे, हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. भगवानगडाच्या पायरीचा दगड होण्याचे जरी भाग्य मला लाभले तरी माझे आयुष्य सार्थक झाले असे मी समजेल.

धनंजय मुंडे यांना भक्तीचा वारसा

महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी सांगितले की, धनंजय मुंडे यांचे आजोळ देव धानोरा (ता. कळंब जि. उस्मानाबाद) येथे धनंजय मुंडे यांच्या मातोश्रींना भगवानगडाच्या दिंडीची, प्रत्यक्ष भगवान बाबांची सेवा घडलेली आहे, त्यांच्या कुटुंबात भगवानगड भक्तीचा वारसा आहे, त्यामुळे धनंजयला भगवान बाबांचे आशीर्वाद प्राप्त आहेत. अलीकडेच धनंजय मुंडे यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. मागील काळात त्यांच्यावर सातत्याने विविध संकटे आली, मात्र भगवान बाबांच्या कृपाशीर्वादाने धनंजय यांचे काहीही नुकसान होणार नाही, असे महंत नामदेव शास्त्री सानप यांनी सांगितले.

भगवान गड हा भगवान बाबांनी उभारला, एक शक्तिपीठ म्हणून आता गड प्रेरणेचा स्रोत बनला आहे. लाखो भाविकांची इथे श्रद्धा आहे. असे म्हणत धनंजय मुंडे यांनी महंत डॉ. नामदेव शास्त्री यांना नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, ऋषीकेश ढाकणे, राजाभाऊ दौंड, योगेश खेडकर यांसह लाखो भाविक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT