<div class="paragraphs"><p>Dhananjay Munde</p></div>

Dhananjay Munde

 
Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'माझा तर नेमच नव्हता... मी निवडून येईल, असे कोणालाच वाटत नव्हते!'

सरकारनामा ब्यूरो

अहमदनगर : राज्याच्या राजकारणामध्ये परळी मतदार संघाची चर्चा नियमीत होत असते. राज्याचे सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात झालेली २०१९ च्या विधानसभेची निवडणूक चांगलीच रंगली होती. त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी तब्बल ३१ हजार मतांनी पंकजा यांचा पराभव केला. या निवडणुकीत मी विजयी होईल असे कोणालाच वाटत नव्हते, असे धनंजय मुंडे यांनी स्वतःच सांगितले.

राज्यात सध्या नगरपंचायतीच्या निवडणुका सुरु आहेत. त्यामध्ये कर्जत नगरपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजपचे नेते राम शिंदे यांनी प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीची कर्जतमध्ये शुक्रवारी प्रचारसभा झाली. त्या वेळी धनंजय मुंडे, गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल उपस्थित होते. या वेळी मुंडे यांनी भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली.

धनंजय मुंडे म्हणाले, रोहित पवारांनी मतदार संघात जादू केली. 20 वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मतदार संघात रोहित पवार येताच आमदार झाले. नगरपंचायतची एक जागा बिनविरोध झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत 12 खात्यांच्या मंत्र्याला पराभवाची धूळ चारली. त्या वेळी राज्यात दोनच निवडणुकांची चर्चा झाली. एक आमची (परळीची) आणि दुसरी रोहित पवार यांची. मी प्रचारासाठी आलो होतो, त्या वेळी रोहित पवार ३५ हजार मतांनी निवडून येतील असा अंदाज होता. मात्र, तुम्ही त्याही पुढे गेलात. माझा तर काय नेमच नव्हता. कोणाला वाटत नव्हते मी निवडून येईल, पण मी ३१ हजारांनी आलो, असे मुंडे यांनी सांगितले.

मुंडे यांनी यावेळी भाजपवर सडकून टिका केली. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार आले आणि ओबीसींचे आरक्षण गेले असे ते म्हणतात. न्यायालयीन प्रक्रिया एका दिवसात होत नाही. त्यांनी चुका केल्या आणि नेमके आमच्याकडे सत्ता आल्यावर निकाल आला. टीका करणाऱ्यांना महाराष्ट्राचे राजकारण माहिती आहे का. ते मंडल आयोगाच्या वेळी कमंडलचे राजकारण करत होते. त्या वेळी महाराष्ट्राने मंडल आयोग जशाच्या तसा स्वीकारला होता. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवारच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, असेही मुंडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT