Nilesh lanke & Dhananjay Munde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

धनंजय मुंडे लंकेंना म्हणतात, "मलाही तुमच्यासारखा संघर्ष करावा लागला."

पारनेर ( Parner ) तालुक्याचे आमदार नीलेश लंके ( MLA Nilesh Lanke ) यांनी तालुक्यातील विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून आणला आहे.

मार्तंड बुचुडे

पारनेर ( अहमदनगर ) : पारनेर तालुक्याचे आमदार नीलेश लंके यांनी तालुक्यातील विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून आणला आहे. यातील पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील 7 कोटी 79 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण राज्याचे विधी व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. Dhananjay Munde said that MLA Lanke is a leader of the people because of his popularity

माजी आमदार दादाभाऊ कळमकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार  नीलेश लंके, अशोक सावंत, बाबाजी तरटे, उद्धव दुसुंगे, सुदाम पवार, सुरेश धुरपते, सुनंदा धुरपते, राजश्री कोठावळे, पुनम मुंगसे, विक्रम कळमकर, जितेश सरडे, विजय औटी, किशोर यादव, विशाल आहेर, अतुल लोखंडे, नीलेश लटांबळे, किरण पठारे, सोमनाथ वाखारे, सरपंच बाळासाहेब सोनवणे, उपसरपंच रवी शेळके, डॉ. मच्छिंद्र नरवडे, जालींदर तानवडे, भानुदास घनवट, अरूण घनवट, प्रमोद घनवट, राजेंद्र शेळके, उद्धव शेळके, योगेश रासकर, अमोल यादव, यादववाडीच्या सरपंच मीना यादव व सदस्य, वाडेगव्हाण ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

धनंजय मुंडे म्हणाले, संघर्ष करणारी दोन माणसं एकत्र आली तर त्यांना एकमेकांविषयी माया वाटते. आपलीच एक प्रतिकृती सामान्य माणसांसाठी लढते. याचा मला सार्थ अभिमान आहे. मी मंत्रालयात असो वा परळीत मला आमदार नीलेश लंके यांच्या कामाचे कौतुक वाटते. असे सांगतानाच आमदार लंके यांना लोकमान्यता मिळाल्यानेच त्यांना सर्वजण नेते म्हणून संबोधतात असे मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

मुंडे पुढे म्हणाले, आमदार लंके यांच्या पक्षप्रवेशाला मी उपस्थित होतो. जीवनात मी अनेक सभा पाहिल्या मात्र लंके यांच्या प्रवेशाची सभा नेहमीच स्मरणात राहील. कार्यक्रमास उत्स्फुर्त गर्दी, सभेला येण्यासाठी कोणतेही साधन नाही. त्याच व्यासपीठावर निवडणुकीसाठी मदतीचे धनादेश ! आमदार लंके तुम्ही खरोखर भाग्यवान आहात ! तुमचं व माझं सारखंच आहे. फक्त माझ्या नावात दम आहे. मलाही तुमच्या सारखाच संघर्ष करावा लागला असे ते म्हणाले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा 55 वर्षांचा राजकीय प्रवास पाहिला तर शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले काम त्यांनी केले असल्याचे कृतीतून दिसून येते. अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. महिलांना संधी दिली. मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीला दोष दिला जातोय. परंतु न्यायालयात साक्ष पुरावे भाजप सरकारच्या काळात झाले, निकाल मात्र आमच्या काळात लागला मग आम्ही दोषी कसे असा सवाल त्यांनी केला.

युवा कार्यकर्त्याचा दमदार कार्यक्रम

अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या किशोर यादव यांनी या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. वाडेगव्हाणमध्ये आतापर्यंत पार पडलेल्या कार्यक्रमांपेक्षा या कार्यक्रमाची उपस्थितीत लक्षवेधी होती. मोठ मोठे बॅनर, विशाल हार, फटाक्यांच्या आतषबाजीसह मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. युवा कार्यकत्याचा दमदार कार्यक्रम अशीच या कार्यक्रमाचे वर्णन करावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT