Siddheshwar Sugar Factory Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : 'मी कोणाचेही वाईट केले नाही'; ‘सिद्धेश्वर’च्या चिमणी पाडकाम कारवाईने धर्मराज काडादींचे डोळे पाणावले

Siddheshwar's Chimney Demolition Operation: कोणत्याही राजकीय पक्षात नसताना शेतकऱ्यांसाठी काम केले. तरीपण, काहींनी सातत्याने जाणीवपूर्वक त्रास दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामा ब्यूरो

Siddheshwar Sugar Factory: अप्पासाहेब काडादी यांनी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची सुरवात सहकारी तत्त्वावर सुरु केली. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळसह तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कारखान्यामुळे मोठा आधार मिळाला. २८ हजार शेतकरी सभासद व १५ हजारांपर्यंत कामगारांची रोजीरोटी कारखान्यावर अवलंबून असतानाही त्यांचा विचार न करता चिमणी पाडकामाची कारवाई केली जात आहे. ‘मी कोणाचे वाईट केले नाही, तरीपण माझे सोडा, किमान माझ्या शेतकरी व कामगार बांधवांच्या संसाराचा तरी करायला हवा होता’, अशी उद्विग्न भावना व्यक्त करताना धर्मराज काडादी यांचे डोळे पाणावले. (Dharmraj Kadadi's eyes watered with the chimney demolition operation of 'Siddheshwar')

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची (siddheshwar Sugar Factory) चिमणी पाडकामाची बुधवारपासून (ता. १४ जून) सुरु झाली आहे. परजिल्ह्यातून राखीव पोलिस बंदोबस्त बोलावून कारवाई केली जात आहे. ही कारवाई थांबविण्यासाठी कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi) यांनी रातोरात मुंबई (Mumbai) गाठली. त्यांनी मुंबईत मंत्रालयात जावून काही नेत्यांच्या भेटीतून कारवाई थांबविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही.

कारखान्याची गाळप क्षमता वाढवून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका कारखान्याने घेतली आहे. सन १९७०-७१ पासून कारखान्याने शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. अशावेळी कारखान्याचे सभासद, कारखान्यावर अवलंबून असलेले कामगार, यांच्या कुटुंबाचा विचार न करता सातत्याने काहींनी त्रास देण्याची भूमिका घेतली. अशावेळी मायबाप सरकारने तरी त्या हातावरील पोट असलेल्यांचा विचार करायला हवा होता, अशी अपेक्षा काडादींनी बोलून दाखविली.

कोणत्याही राजकीय पक्षात नसताना शेतकऱ्यांसाठी काम केले. तरीपण, काहींनी सातत्याने जाणीवपूर्वक त्रास दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. माझ्या बळिराजाचे व कामगारांचे हित न पाहता केलेली कारवाई निश्चितपणे महागात पडेल, असा इशाराही त्यांनी या वेळी संबंधितांना दिला.

धर्मराज काडादी हतबल

धर्मराज काडादी यांनी शेतकऱ्यांचा विचार करूनच कारखान्याची गाळप क्षमता वाढविली होती. विमानतळ विकास प्राधिकरण किंवा नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाशी या कारवाईचा काही संबंध नाही. मात्र, महापालिकेची परवानगी न घेता चिमणी बांधली, यावरून पाडकामाची कारवाई केली जात आहे. ती थांबावावी म्हणून त्यांनी मुंबईत जावून काही मंत्र्यांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातून देखील स्टे घेण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. पण, त्यांना ही कारवाई थांबविण्यात यश आले नाही. शेवटी हतबल होऊन ते आल्या पावली परतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT