Ramdas Athwale news
Ramdas Athwale news 
पश्चिम महाराष्ट्र

Ramdas Athwale News : महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन मतभेद.. ; आठवलेंनी पुन्हा डिवचलं

संभाजी थोरात

Sangali news : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागा वाटपावरुन मतभेद असल्याचे अनेकदा समोर आले आहे. सत्तेत असताना कॉंग्रेस आणि इतर घटक पक्षांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे महाविकास आघाडीतली नाराजी अनेकदा जाहीररित्या समोर आली होती. सत्तांतरानंतरही याच मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजप-शिंदे गटातील नेत्यांकडून याचा उल्लेख केला जातो. असे असताना आता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनीदेखील जागावाटपावरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जागा वाटपावरून मतभेद होणार असल्याने आघाडीचा काही उपयोग होणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. आठवले म्हणाले, उध्दव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही कारण भीम शक्ती माझ्याकडे आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा 350 जागा निवडून आणेल तर एनडीए 450 जागा जिंकेल. त्यामुळे पुन्हा एकदा आमचीच सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांची यात्रा भारत जोडण्यासाठी नाही तर भारत तोडण्यासाठी आहे. राहुल गांधी कधीही पंतप्रधान होणार नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. तर, सरकार 2024 पर्यत कार्यकाळ पूर्ण करेल, असा टोलाही त्यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त मे महिन्या शाहूंची भूमी कोल्हापूर येथे आर. पी. आयचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अधिवेशनाला देशभरातील आर पी आय चे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील काही वक्ते या व्यासपीठावर येणार आहे. शिव-शाहू-फुले- आंबेडकरांची विचारधारा तळागाळात पोहचवण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचही आठवले यांनी सांगितलं. या अधिवेशनाच नियोजन सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT