Prithviraj Chavan News : विदर्भात आज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भात ज्या विकासकामांचे दिवे लावले आहेत, त्यावर चर्चेची अधिक आवश्यकता आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
हिवाळी अधिवेशन नागपूरला घेतले जाते. यानिमित्ताने विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाचा कालावधीही कमी केला आहे, यावरून पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी फडणवीसांना Devendra Fadanvis चिमटा काढला.
ते म्हणाले, नागपूर कराराप्रमाणे राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेतले जाते. यानिमित्ताने विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी केला आहे. सत्ताधारी असताना आणि विरोधी पक्षात असताना वेगळी भूमिका घ्यायची हा या सरकारचा दांभिकपणा आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये न झाल्याने फडणवीस यांनी तत्कालीन सरकारवर टीका केली होती. आता आपलीच जुनी टीका त्यांनी आठवावी. विदर्भात आज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भात ज्या विकास कामांचे दिवे लावले आहेत, त्यावर चर्चेची अधिक आवश्यकता आहे. ललित पाटील या संशयिताचे उच्चपदस्थ लोकांशी संबंध असावे. सरकार, प्रशासनातील कोणती मंडळी यात गुंतली आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली. Maharashtra Political News
सरकारला निवडणुकांची भीती
राज्यातील सत्ताधाऱ्यांना लोकांपर्यंत जाण्याची भीती वाटते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तुम्हाला घेता येत नाहीत. लोकांमध्ये रोष आहे आणि या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागणार असल्यानेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.