Shahaji Bapu Patil|
Shahaji Bapu Patil| 
पश्चिम महाराष्ट्र

Shahaji Bapu Patil| झाडी, डोंगार नंतर शहाजी बापूच्यां चकवा'ची चर्चा

जगदीश पानसरे :सरकारनामा

सोलापूर : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत गुवाहाटीला जाणाऱ्यांमध्ये आमदार शहाजीबापू पाटीलही होते. गुवाहाटीतील त्यांच्या 'काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल… एकमदम ok…' या डायलॉगमुळे शहाजीबापू रातोरात प्रसिद्ध झाले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, राजकीय नेतेमंडळी मग ते विरोधक का असेनात, प्रत्येकांच्या तोंडात हा डायलॉग आजही ऐकायला मिळतो. पण आता शहाजी बापू आणखी एका डायलॉगमुळे चर्चेत आले आहेत.

सांगोल्यातील बापूसाहेब झपके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमातील त्यांचे भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या कॉलेज जीवनातील आठवणी सांगताना शहाजी बापू पाटील म्हणाले, ''सैनिकीशाळेतील विद्यार्थी हॉलीबॉल ,बास्केटबॉल खेळ खेळायचे, पण आम्ही मात्र कबड्डी, खो-खो असे मैदानी आणि देशी खेळ खेळायचो. बास्केटबॉल, हॉलीबॉल या खेळांमध्ये चकवा देत संघ विजयी होतात. पण कल्याण शेट्टीसाहेब आपण पण चकवा द्यायचंच काम करतोय, आपला धंदाबी चकवा द्यायचाच हाय. त्यांचा चकवा बसला तर बॉल वर गेला, आमचा चकवा बसला तर गुलाल अंगावर पडला.

पण फरक एवढा आहे की एक चकवा चुकला तर लगेच दूसरा धडाधडा चकवा टाकायला रिकामा झाला. पण आमचा एक चकवा चुकला तर पाच वर्षे घरात बसायला लागतंय. अशी मिश्किल टिपण्णी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली. पण आता सलगरे गावाचं आणि शहाजीबापू पाटलांच नातं जोडलं गेलं आहे. तुम्ही कोणतही काम सांगा मी ते केल्याशिवाय राहणार नाही. गावाचं कोणतही काम असू दे ते काम करु, अशी ग्वाही यावेळी शहाजी बापू पाटील यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT