Harshada Deshmukh, Prabhakar Deshmukh
Harshada Deshmukh, Prabhakar Deshmukh sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्याच्या राजकारणात या बाप-लेकीच्या जोडीची चर्चा

रूपेश कदम

सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सध्या एका बाप-लेकीच्या जोडीची चर्चा सुरु आहे. ही जोडी म्हणजे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख व त्यांची कन्या रयत शिक्षण संस्थेची जनरल बॉडी सदस्य, के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा देशमुख-जाधव होय. बापासाठी धावून येणारी, कोणत्याही प्रसंगाला कणखरपणे सामोरी जाणारी, राजकारणात बापाची सावली बनून राहणारी लेक म्हणून हर्षदा देशमुख-जाधव यांची जिल्ह्याच्या राजकारणात नवी ओळख बनू लागली आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शरद पवार - सुप्रिया सुळे, स्व. गोपीनाथ मुंडे - पंकजा मुंडे-पालवे, हर्षवर्धन पाटील - अंकिता पाटील, एकनाथ खडसे - रोहिणी खडसे, सुनील तटकरे - आदिती तटकरे या जोड्या प्रसिद्ध आहेत. या जोड्यानंतर सातारा जिल्ह्यात प्रभाकर देशमुख - हर्षदा देशमुख-जाधव ही जोडी लक्षवेधून घेत आहे.

जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर, काही विकास सोसायट्या, नगरपंचायत निवडणूकांचा गुलाल उधळण्यात आला. तर आगामी काळात नगरपरिषद, उर्वरित विकास सोसायट्या व महत्वाची जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. माण-खटाव तालुक्यातील विविध निवडणूकीत विशेषतः विधानसभा निवडणुकीनंतर दहिवडी व वडूज नगरपंचायतीत निवडणुकांमध्ये हर्षदा देशमुख-जाधव यांचा वावर लक्षवेधी ठरला.

त्यांनी आपल्या सर्व कार्यबाहुल्यातून वेळ काढून या दोन्ही नगरपंचायतींच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले. पायाला भिंगरी बांधून रात्रंदिवस त्यांनी प्रचार केला. यामुळे प्रभाकर देशमुख यांना गोपनीय हालचाली करण्यास वेळ मिळाला. राष्ट्रवादीने जी यशाला गवसणी घातली त्यात हर्षदा देशमुख-जाधव यांची प्रचार यंत्रणा सुध्दा महत्वपूर्ण ठरली आहे. बापासाठी धावून येणारी, कोणत्याही प्रसंगाला कणखरपणे सामोरी जाणारी, राजकारणात बापाची सावली बनून राहणारी लेक म्हणून हर्षदा देशमुख-जाधव यांची ओळख बनू लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT