Shashikant Shinde, Mahesh shinde
Shashikant Shinde, Mahesh shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बारामतीकरांचा नाद करू नका... अन्यथा संपाल... शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेंना इशारा

सरकारनामा ब्युरो

सातारा : बारामतीच्या नादाला जेवढे लागलेत तेवढे संपलेत. राजकारणात ताजं उदाहरण बघायचं झालं, तर हर्षवर्धन पाटील यांच्यापासून अनेक जणांनी बारामतीचा नाद केला. परंतु, ज्यांनी नाद केला तेवढे संपून गेले, हा इतिहास आहे. त्याच पध्दतीनं भविष्यात यांना त्यांची जागा दाखविली जाईल, असा इशारा विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांना दिला आहे.

जिल्ह्यातील किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त आयोजित सभांमध्ये आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे हे एकमेकांवर टिकास्त्र सोडत आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांनी नुकतेच विरोधकांना ... लावण्याची भाषा केली. तर, आमदार महेश शिंदे यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

विधानसभा निवडणूक त्यानंतर जिल्हा बॅंक निवडणूक आणि आता किसनवीर कारखान्याच्या निमित्तानं दोन्ही आमदार शिंदे ते एकमेकांसमोर प्रचारादरम्यान उभे आहेत. महेश शिंदे यांनी जरंडेश्वर कारखान्यावरून अजित पवार आणि शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता शशिकांत शिंदे यांनीही महेश शिंदे यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे.

शशिकांत शिंदे म्हणाले, राज्यात आदरणीय शरद पवार आणि अजित दादा यांच्यावर आरोप केल्याशिवाय राजकारणात महत्व प्राप्त होत नाही. सातारा जिल्ह्यातही रयत शिक्षण संस्था आणि जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात टीका टिपणी सुरू आहे. ज्यांचा राजकीय जन्म शरद पवार यांच्या आशीर्वादामुळे झाला. त्यांनी टीका करू नये. राजकारणाची पातळी सोडून टीका करतात त्यावेळी त्यांना जागा दाखविण्याची वेळ येईल.

कुणी जास्त अहमपणा दाखवू नये. शरद पवार असे नेतृत्व आहे, ज्यांना देशाचे पंतप्रधान मानसन्मान देत असतात. बारामतीच्या नादाला जेवढे लागलेत तेवढे संपलेत. राजकारणात ताजं उदाहरण बघायचं झालं, तर हर्षवर्धन पाटील यांच्यापासून अनेक जणांनी बारामतीचा नाद केला. परंतु, ज्यांनी नाद केला तेवढे संपून गेले, हा इतिहास आहे. तेव्हा येणाऱ्या भविष्य काळात आरोप करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविली जाईल, असा इशारा त्यांनी महेश शिंदे यांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT