Dr. Ajit Navale
Dr. Ajit Navale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

डॉ. अजित नवले म्हणाले, अधिकारी संघटितपणे शेतकऱ्यांवर हल्ला करतात ही शरमेची बाब...

Amit Awari

अहमदनगर - हिंगोली जिल्ह्यातील पातोंडा गावात वन अधिकारी विश्वनाथ टाक यांनी 5 जानेवारीला सकाळी 7 वाजता वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गरीब वन जमीन धारकांवर, ते कसत असलेल्या वन जमिनीतून त्यांना अमानुष मारहाण केली, असा आरोप करत किसान सभेतर्फे डॉ. अजित नवले ( Dr. Ajit Nawale ) यांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत महाराष्ट्र शासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. Dr. Ajit Nawale said that it is a matter of shame that the authorities attack the farmers in an organized manner.

डॉ. अजित नवले म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यातील पातोंडा गावातील जंगलात वन जमीन करणाऱ्या आदिवासी व दलित शेतकऱ्यांवर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय संघटित अमानुष हल्ला केला. यामध्ये महिला शेतकऱ्यांना पुरुष अधिकाऱ्यांनी बेदम अमानुष मारहाण केली. अनेक शेतकऱ्यांना जखमी होईपर्यंत मारण्यात आले. संघटित हल्ला करून शेतकऱ्यांकडून त्यांच्या जमिनी काढून घेण्यात आल्या. किसान सभेतर्फे या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. पुरोगामीत्वाचा टेंभा मिरविणाऱ्या महाराष्ट्रात अशा पद्धतीने आदिवासी व दलितांवर संघटितरित्या अधिकारी हल्ला करणार असतील तर या पेक्षा जास्त शरमेची बाब दुसरी कोणतीही असू शकत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने या अत्याचाराची तातडीने दखल घ्यावी. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे. त्यांना नोकरीवरून काढत कठोरात कठोर शासन करावे. बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. ते कसत असलेल्या जमिनी त्यांच्या नावावर कराव्यात.

या घटनेचा त्रास सहन न झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. त्या आत्महत्त्याग्रस्त कुटुंबाला तातडीने दहा लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी. महाराष्ट्र सरकारने अशा उपाययोजना केल्या नाहीत तर किसान सभेतर्फे महाराष्ट्रभर या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT