Dr. Rajendra Rupnawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan Hospital : फलटण रुग्णालयातील आणखी एका डॉक्टराचा आत्महत्येचा प्रयत्न; फिटनेस सर्टिफिकेटसाठी माजी मंत्र्यांच्या ओएसडीचा दबाव

Dr. Rajendra Rupnawar Attempt Suicide : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील कामकाज आणि कथित राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी मुंबईतील सायन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. रेल्वे पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 28 August : महिला डॉक्टराने आत्महत्या केल्यानंतरही फलटण उपजिल्हा रुग्णालयातील कामकाजात सुधारणा झालेली नाही. वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी राजकीय नेत्यांकडून दबाव टाकणे, वरिष्ठांकडून त्रास दिला जातो. दोनवेळा आत्महत्येचा इशारा देऊन आणि स्मरणपत्रेही देऊन प्रशासन ठाम आहे, त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र रुपनवर यांनी मुंबईत सायन रेल्वे स्टेशन परिसरातील हाय होल्टेज टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे पोलिस वेळेत दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे.

एका माजी मंत्र्यांच्या स्वीय्य सहायकाने शस्त्र परवान्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करून डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी २५ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील फितरी येथे एका टेकडीवर जाऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.

डॉ. रुपनवर यांच्या आत्महत्येच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी त्यांचे समुपदेशन करून त्यांची समजूत घातली होती. मात्र, डॉ. रुपनवर यांनी नोकरीचा राजीनामा देऊन उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी झाली. मात्र, महिना होऊनही चौकशी अहवाल न आल्याने १८ ऑगस्ट रोजी डॉ. रुपनवर यांनी पुन्हा आत्महत्येचा इशारा दिला होता.

त्यानुसार डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी मुंबईत सायनमध्ये हाय होल्टेज ‘टॉवर’वर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे पोलिस आणि अग्निमशन दलाचे कर्मचारी यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

महिनाभरापूर्वी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांनी प्रसाद प्रदीप कोंडे-देशमुख यांचे नाव हातावर लिहून तसेच, डायरीत घटनाक्रम नोंदवत टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिला होता. मात्र, फलटण पोलिसांनी त्यांचे समुपदेशन केले होते. मात्र, न्याय मिळत नसल्याने त्यांनी पुन्हा मुंबईत जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाच.

याबाबत फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मदने यांनी फलटण पोलिस ठाण्यात अर्ज दिला आहे. डॉ. राजेंद्र रुपनवर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आत्महत्येची धमकी देऊन बदनामी करत आहेत, असा अर्ज दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT